पेठ : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून आदिवासी भागातील १२ गावांमध्ये शालेय मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.जागतिक आदिवासी दिन साजरा करताना ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ मिळावे, शालेय शिक्षणापासूनच त्यांच्यातल्या वक्तृत्व कला जोपासल्या जाव्यात तसेच ग्रामीण भागातील मुलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून पेठ, त्र्यंबक व दिंडोरी तालुक्यांतील पेठ, उस्थळे, कोटंबी, हातरूंडी, गारमाळ, भुवन, शेवखंडी, तोरंगण, चिरापरली, अंबोली, कोकणगाव आदी गावांत या स्पर्धा पार पडल्या.यामध्ये विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, तालुका समन्वयक आर. डी. शिंदे, संदीप बत्तासे, जयदीप गायकवाड, राहुल गाडगीळ तसेच ग्राम समन्वयक यांनी परिश्रम घेतले.
शालेय मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 23:39 IST
पेठ : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून आदिवासी भागातील १२ गावांमध्ये शालेय मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
शालेय मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा
ठळक मुद्देजागतिक आदिवासी दिन : सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम