शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

इयत्ता पहिलीसाठी शाळांची प्रवेशप्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:40 AM

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असताना अन्य शासकीय व अनुदानित शाळांमध्येही पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून शहरासह जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये परंपरेनुसार १ मे रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असताना अन्य शासकीय व अनुदानित शाळांमध्येही पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून शहरासह जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये परंपरेनुसार १ मे रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.राज्यभरातील विविध शाळांमध्ये १ मे रोजी शाळेत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करून शाळेचा निकाल जाहीर करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये दोन दिवस अगोदरच विद्यार्थ्यांचे निकालपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. परंतु, यावर्षी नाशिक जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने बहुतांशी शिक्षकांवर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांनी यावेळी परीक्षा संपल्यानंतर तत्काळ निकालपत्र तयार करून ठेवले असून जवळपास सर्व शाळांची निकाल प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे. प्राथमिक शाळांमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या चाचण्या व परीक्षा २० एप्रिलपूर्वीच पूर्ण करण्यात आल्या आहे. आता महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांकडून शून्य ते ६ व ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे.डोनेशनमुळे शिक्षणाचा बाजारशैक्षणिक वर्ष २०१८-१९चे दुसरे सत्र संपत आल्याने विविध कारणांनी पाल्याची शाळा बदलू इच्छिणाºया पालकांना नवीन शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळवून देणे कठीण झाले आहे. अनेक शाळांकडून पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून २५ हजार ते ५० हजार रुपयांचे डोनेशन मागितले जाते. त्याचप्रमाणे नर्सरीसह पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या प्रवेशासाठीही पालकांकडून अशाप्रकारे डोनेशनची मागणी होत असल्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु, शिक्षण विभागाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असून त्यामुळे काही शिक्षण संस्थाचालकांकडून शिक्षणाचा बाजार मांडण्याचा प्रकार सुरू झाला आहे.स्थलांतरितांना  १५ जूननंतर प्रवेशनव्याने शाळेत दाखल होणाºया पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू असली तरी विविध कारणांनी स्थलांतरित झाल्यामुळे शाळा बदलावी लागणाºया विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात १५ जूननंतर प्रवेश दिले जाणार आहेत. दरम्यान, चालू शैक्षणिक वर्ष ६ मे पर्यंत सुरू राहणार असून तोपर्यंत पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू राहणार आहे. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करता येणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा