ओझर येथे शाळा प्रवेशोसत्व जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 14:57 IST2019-06-17T14:56:39+5:302019-06-17T14:57:02+5:30

ओझर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.रविवारी सायंकाळी मशालफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

School admission celebration at Ojhar | ओझर येथे शाळा प्रवेशोसत्व जल्लोषात

ओझर येथे शाळा प्रवेशोसत्व जल्लोषात

ओझर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.रविवारी सायंकाळी मशालफेरीचे आयोजन करण्यात आले होते.सोमवारी सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी पहिलीत गेलेल्या विद्यार्थ्यांना सजवलेल्या वाहनात बसवून गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली.अग्रभागी बँड त्यापाठीमागे पुस्तक दिंडी व सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यानंतर शाळेच्या प्रांगणात झालेल्या स्वागत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग अहेर होते.सरस्वती पूजन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली.प्रत्येक वर्गाच्या दाराला तोरण बांधण्यात आले होते. यावेळी मुख्यध्यापक रजनी सोनवणे,कुसुम जाधव,मीरा बिरारी,योगेश्वरी खैरनार,वंदना धरमखेले,दीपाली साळुंके,सुनंदा सूर्यवंशी,निर्मला पेखळे, सुमन तडवी,ज्योती चव्हाण,माधुरी चौरे,आशा दुसाने,मीनाक्षी जगताप,उज्वला सूर्यवंशी,प्रतिमा सूर्यवंशी,ज्योती गीते,मंगल खरात,सोनाली सरोदे,सुषमा वसावे,दीपाली गडरी,गायत्री वाघ यांच्यासह पालक उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वंदना धरमखेले यांनी केले.

Web Title: School admission celebration at Ojhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक