शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

‘राजसारथी’मधील घरफोडीचा डाव उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:45 PM

येथील राजसारथी सोसायटीत रविवारी (दि.१६) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तिघे चोरटे प्रवेश करून एका बंद घराला लक्ष्य करतात. यावेळी एका रहिवाशाची नजर त्यांच्यावर पडते. रहिवाशाकडून प्रसंगावधान राखत तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या ‘टोल-फ्री’ क्रमांकावर संपर्क साधला जातो.

इंदिरानगर : येथील राजसारथी सोसायटीत रविवारी (दि.१६) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तिघे चोरटे प्रवेश करून एका बंद घराला लक्ष्य करतात. यावेळी एका रहिवाशाची नजर त्यांच्यावर पडते. रहिवाशाकडून प्रसंगावधान राखत तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या ‘टोल-फ्री’ क्रमांकावर संपर्क साधला जातो.काही वेळेतच यंत्रणेकडून सतर्कतेचा ‘कॉल’ राजसारथी सोसायटीमधील सर्व रहिवाशांना व जवळच्या पोलीस ठाण्याला मिळतो अन् अवघ्या काही वेळेत घटनास्थळी पोलिसांची मदत पोहोचते. नागरिकांच्या मदतीने पोलिसांकडून घरफोडीचा चोरट्यांचा डाव उधळला जातो. यावेळी ही एक रंगीत तालीम (मॉकड्रिल) असल्याची उद्घोषणा होते आणि सर्व रहिवासी सुटकेचा नि:श्वास सोडतात.इंदिरानगर परिसरात मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना रोखण्यासाठी नागरिकांची सतर्कता महत्त्वाची असून, प्रसंगावधान राखत नागरी (ग्राम) सुरक्षा यंत्रणेशी (१८००२७०३६००) संपर्क साधल्यास आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ परिसरातील रहिवाशांनाही सावधानतेचा ‘कॉल’ मिळतो आणि जवळच्या पोलीस ठाण्यातदेखील माहिती समजते. इंदिरानगरमधील राजसारथी सोसायटीत राहणारे प्रमोद पिंपळगावकर यांनी नागरी सुरक्षा यंत्रणेला संपर्क साधून तत्काळ परिसरातील घरफोडीची माहिती दिली. यानंतर यंत्रणेकडून सोसायटीतील रहिवाशांना सावधानतेचा इशारा मिळाला तसेच इंदिरानगर पोलिसांना ही घटना समजली. तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोेचले. यावेळी पोलिसांनी इमारतीत प्रवेश करून चोरट्यास ताब्यात घेतले व त्याच्या साथीदारांनाही सापळा रचून अटक केली. आपत्कालीन स्थितीत मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत रंगीत तालीम असल्याचे जाहीर करण्यात आल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला. दरम्यान, येथील दत्त मंदिर परिसरात उपआयुक्त अमोल तांबे यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना ग्राम सुरक्षा यंत्रणेविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला.काय आहे, नागरी-ग्राम सुरक्षा यंत्रणा‘सहाय्यम् सर्वतो सहस्त्रश:’ या ब्रीदनुसार ग्राम सुरक्षा यंत्रणा देशभरात सुरू करण्यात आली आहे. ही यंत्रणा देशपातळीवर असून यासाठी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक ठरते. ज्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी असेल त्याच क्रमांकाला प्रतिसाद दिला जातो. दरोडा, महिलांविषयीचे गुन्हे, लहान मुले बेपत्ता होणे, आगीची घटना, वाहनचोरी, वन्यप्राण्यांचा हल्ला आदी प्रकारच्या आपत्कालीन स्थितीत ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून प्रतिसाद दिला जातो. नोंदणीसाठी ९५९५००६६५० या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस