सावन कृपाल रुहानी मिशनतर्फे आध्यात्मिक संस्थांची परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:31 IST2019-05-23T00:31:41+5:302019-05-23T00:31:57+5:30

सावन कृपाल रुहानी मिशन, नाशिक शाखा यांच्या वतीने संत राजिंदरसिंह ध्यान केंद्र, दर्शन फार्म, म्हसरूळ येथे दोनदिवसीय सायन्स आॅफ स्पिरिच्युअलिटी या आध्यात्मिक संस्थेच्या युवा सेवादारांची परिषद संपन्न झाली.

 Sawan Kripal Ruhani Mission, the Council of Spiritual Institutions | सावन कृपाल रुहानी मिशनतर्फे आध्यात्मिक संस्थांची परिषद

सावन कृपाल रुहानी मिशनतर्फे आध्यात्मिक संस्थांची परिषद

नाशिक : सावन कृपाल रुहानी मिशन, नाशिक शाखा यांच्या वतीने संत राजिंदरसिंह ध्यान केंद्र, दर्शन फार्म, म्हसरूळ येथे दोनदिवसीय सायन्स आॅफ स्पिरिच्युअलिटी या आध्यात्मिक संस्थेच्या युवा सेवादारांची परिषद संपन्न झाली.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेवादारांचे प्रमुख राकेश सचदेव (दिल्ली) व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच वेस्ट झोन प्रमुख बिहारीलाल खेतवानी तसेच संस्थेचे वेस्ट झोनचे समन्वयक महेश अंबवाणी हे उपस्थित होते. ग्रीन इंडिया उपक्र माच्या अंतर्गत आश्रमाच्या जागेत १० वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली, तसेच बाहेरगावाहून आलेल्या सेवादारांना १४० वेगवेगळ्या वृक्षांची रोपे वाटण्यात आली.
यावेळी सावन कृपाल रु हानी मिशन, नाशिक शाखेच्या वतीने कृपाल आयुर्वेद डिस्पेन्सरी मोफत आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथिक आरोग्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला. सावन कृपाल रु हानी मिशन, नाशिक शाखेचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर मौले यांनी आभार मानले.

Web Title:  Sawan Kripal Ruhani Mission, the Council of Spiritual Institutions