सातपूर शिवाजी मंडईला समस्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:38 IST2018-09-26T00:38:08+5:302018-09-26T00:38:28+5:30

येथील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्याची मागणी मंडईतील व्यवसायिकांनी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Satpur Sivaji Mandi accepts problems | सातपूर शिवाजी मंडईला समस्यांचे ग्रहण

सातपूर शिवाजी मंडईला समस्यांचे ग्रहण

सातपूर : येथील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्याची मागणी मंडईतील व्यवसायिकांनी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.  सातपूर गावातील छत्रपती शिवाजी मंडई महत्त्वाची बाजारपेठ असून, याठिकाणी १९८४ पासूनच्या समस्यांची सोडवणूक न झाल्याने व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या ३५ वर्षांपासून रंगरंगोटी झालेली नाही, मंडईतील मोकळ्या जागेवर डोम मंजूर करण्यात आले होते. मात्र हा विषय प्रलंबित राहिलेला आहे. मंडईतील १६५ गाळेधारक व तेवढेच भाजीविक्रेत्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.  यांसह विविध मागण्यांचे निवेदन विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांना देण्यात आले.

Web Title: Satpur Sivaji Mandi accepts problems