शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सासूरवाशिणीला मिळाली माहेरची माया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 9:01 PM

खामखेडा : एकीकडे हुंड्यासाठी महिलांचा शारीरिक, मानसिक त्रास होणाऱ्या घटना घडत असताना सासूरवाशिणीला माहेरच्यांसारखी माया देणारेही पहावयास मिळाले. इतकेच नव्हे तर मुलीप्रमाणे तिचा सत्कार करून सन्मानही केला.

खामखेडा : एकीकडे हुंड्यासाठी महिलांचा शारीरिक, मानसिक त्रास होणाऱ्या घटना घडत असताना सासूरवाशिणीला माहेरच्यांसारखी माया देणारेही पहावयास मिळाले. इतकेच नव्हे तर मुलीप्रमाणे तिचा सत्कार करून सन्मानही केला. त्याचे झाले असे की, सावकी येथील सासर असलेल्या व सध्या मालेगावी येथील आरोग्य विभागात नोकरीस असणाºया अधिपरिचारिका अश्विनी पवार या सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात कर्तव्यावर जाताना सावकीच्या ग्रामस्थांकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना भारावलेल्या मनाने सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. अश्विनी पवार यांचे सासर देवळा तालुक्यातील सावकी येथील आहे. त्या मालेगावातील आयएमएएचपी रुग्णालयात अधिपरिचारिका या पदावर काम करतात. त्याचे संपूर्ण कुटुंब सावकी येथे वास्तव्यास आहे. त्या यापूर्वी सावकी येथून कर्तव्यावर ये-जा करत असत. त्यामुळे कुटुंबापासून लांब राहाण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता. परंतु मालेगावात कोरोना विषाणूने शिरकाव केला अन् बघता बघता काही दिवसातच मालेगाव शहर कोरोना हॉटस्पॉट म्हणून परिचित झाले.मालेगावात काम करत असताना मोठ्या प्रमाणात डॉक्टर, पोलीस तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी बाधित होऊ लागल्यामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली. या कारणाने कर्मचाºयांना सुटी मिळणेदेखील दुरापास्त झाले. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून अश्विनी कोरोनाच्या सावटात आपले कर्तव्य अविरतपणे पार पाडत होत्या. एरवी सावकी येथून ये-जा करणाºया अश्विनी पहिल्यांदाच इतक्या दिवस कुटुंबापासून लांब राहिल्या. त्यात पुन्हा घरी परत येऊ की नये याची धास्ती. कुटुंबाशी फोनवर बोलणे व्हायचे; परंतु प्रत्यक्षात भेटण्याची ओढ लागली होती.अखेर दोन-अडीच महिने सेवा बजावल्यानंतर सुट्टी मिळाली. तत्पूर्वी त्यांच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तरीही काही दिवस क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये त्यांना राहावे लागले. तो कालावधी संपल्यानंतर त्या सावकी येथील आपल्या मूळ गावी म्हणजे सासरी परतल्या. कुटुंबातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांनी ‘कोरोना योद्धा’ म्हणून त्यांचे जोरदार स्वागत केले.कुटुंबासमवेत वेळ घालवल्यानंतर सहा दिवस विश्रांतीनंतर आज पुन्हा रु ग्णसेवा हाच आपला धर्म मानत आपल्या मालेगाव येथील मूळसेवेत रुजू होण्यासाठी निघाल्या असता यावेळी सावकी ग्रामपंचायतीकडून त्यांचा सत्कार करत ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून भारावलेल्या मनाने सन्मानपूर्वक निरोप दिला. यावेळी सावकीचे उपसरपंच अरुण पाटील, ग्रामसेवक वैशाली पवार, ग्रामपंचायत सदस्य कारभारी पवार, राजाराम गोधडे, उशाबाई सोनवणे, अक्काबाई गायकवाड, अहिल्याबाई पवार, पोलीसपाटील अश्विनी बच्छाव, नीलेश पाटील, केवळ भामरे, आरोग्यसेवक दिनेश शेवाळे, आरोग्य सहाय्यक संजय कुंभार्डे, आरोग्यसेविका रंजना वळवी आदी उपस्थित होते.------------------पहिल्यांदाच घरापासून इतक्या दिवस लांब राहिले. त्यात पुन्हा घरी परत येऊ की नाही ही धास्ती होती. आपल्यावर संपूर्ण कुटुंब भावनिकरीत्या अवलंबून असताना आपण सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे. आयुष्यातील या दोन-अडीच महिन्यांत जगण्याचा खरा अर्थ नव्याने समजला. आज कामावर पुन्हा रु जू होत असून, रु ग्णसेवा हाच आपला धर्म मानत अविरतपणे काम करत राहणार आहे.- अश्विनी पवार, अधिपरिचारिका

टॅग्स :Nashikनाशिक