सरसंघचालक मोहन भागवत बुधवारी नाशिक दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 01:48 IST2021-07-12T01:48:01+5:302021-07-12T01:48:32+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बुधवार, १४ पासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. १४ रोजी आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेच्या चरक भवन या केंद्रीय कार्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण कार्यक्रम कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल, गंगापूर रोड येथे होणार असून आहे. त्यानंतर कन्नमवार पुलाजवळील संघटनेच्या नूतन कार्यालयाच्या वास्तूस ते भेट देतील.

Sarsanghchalak Mohan Bhagwat on a tour of Nashik on Wednesday | सरसंघचालक मोहन भागवत बुधवारी नाशिक दौऱ्यावर

सरसंघचालक मोहन भागवत बुधवारी नाशिक दौऱ्यावर

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बुधवार, १४ पासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. १४ रोजी आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेच्या चरक भवन या केंद्रीय कार्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण कार्यक्रम कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल, गंगापूर रोड येथे होणार असून आहे. त्यानंतर कन्नमवार पुलाजवळील संघटनेच्या नूतन कार्यालयाच्या वास्तूस ते भेट देतील.

१५ रोजी पू स्वामी श्री सवितानंद सेवा समिती (तरसाडा, द.गुजराथ)द्वारे आयोजित स्वामी सवितानंद यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात डॉ. भागवत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नक्षत्र लॉन्स, गंगापूर रोड या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित होणार आहे. कोरोना प्रतिबंधामुळे निमंत्रित लोकांच्या उपस्थितीत हे दोन्ही कार्यक्रम होणार आहेत.

दरम्यान, सदर कार्यक्रम फेसबुक आणि यूट्युब लाइव्हद्वारेदेखील बघता येईल अशी व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली असल्याची माहिती रा. स्व. संघाचे नाशिक शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे यांनी दिली.

 

Web Title: Sarsanghchalak Mohan Bhagwat on a tour of Nashik on Wednesday