शिक्षणाऱ्या मेंढपाळ मुलीला दिली सरपंचाने सायकल भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:29 IST2020-07-28T15:25:12+5:302020-07-28T15:29:42+5:30
सटाणा : मेंढपाळ मुलीची शाळेची फरफट बघून तिच्या शिक्षणाची वाट सुखकर करण्यासाठी नवे निरपूरचे सरपंच शरद सूर्यवंशी यांनी थेट वाड्यावर जाऊन मंगळवारी (दि.२८) त्या मुलीस नवी सायकल सुपूर्द केली.

शिक्षणाऱ्या मेंढपाळ मुलीला दिली सरपंचाने सायकल भेट
ठळक मुद्देशेतातील वाड्यावर जाऊन त्या चिमुकलीस सुपूर्द केली.
सटाणा : मेंढपाळ मुलीची शाळेची फरफट बघून तिच्या शिक्षणाची वाट सुखकर करण्यासाठी नवे निरपूरचे सरपंच शरद सूर्यवंशी यांनी थेट वाड्यावर जाऊन मंगळवारी (दि.२८) त्या मुलीस नवी सायकल सुपूर्द केली.
अतिशय चुणचुणीत हुशार असलेल्या मेंढपाळाच्या हर्षाली या मुलीचा शिक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष, जीवघेणी पायपीट सरपंचांनी पहाताच पत्नी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक असलेल्या रत्नमाला सूर्यवंशी, माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी यांना समवेत घेत नवी सायकल खरेदी केली. व ती थेट पिंपळदर येथील शेतातील वाड्यावर जाऊन त्या चिमुकलीस सुपूर्द केली.