सरोदे यांचे लासलगावी उत्स्फू र्त स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:34 IST2017-12-22T22:53:37+5:302017-12-23T00:34:12+5:30
थायलंड येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत अजिंक्यपद मिळविलेले येथील हनुमान मंडळाचे व्यायामपटू मधुकर सरोदे यांचे लासलगावी जोरदार स्वागत करण्यात आले.

सरोदे यांचे लासलगावी उत्स्फू र्त स्वागत
लासलगाव : थायलंड येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत अजिंक्यपद मिळविलेले येथील हनुमान मंडळाचे व्यायामपटू मधुकर सरोदे यांचे लासलगावी जोरदार स्वागत करण्यात आले. आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक मिळून सरोद यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. येथील बाजार समितीमध्ये मापारी या पदावर काम करणारे सरोदे यांनी थायलंड येथे जाऊन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपले कसब पणाला लावून कांस्यपदक मिळवत आपल्या देशासह जिल्ह्याचा झेंडा फडकवत ठेवला. गुरुवारी (दि. २१) लासलगाव शहरामध्ये आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात त्याची जोरदार अशी गावकºयांच्या वतीने स्वागत करण्यात आले. हनुमान व्यायाम मंडळाचे श्री संजय पाटील व ज्येष्ठ भाजपा नेते प्रकाश दायमा यांच्या वतीने सरोदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्यानंतर फेटा बांधून उघड्या गाडीमधून गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या गावकºयांचे अभिनंदन स्वीकारत सरोदेंनी आभार मानले. यावेळी चंद्रकांत डांगे, उत्तम जाधव, भाजपा शहर अध्यक्ष रवींद्र होळकर, गोपाल भावसार, अण्णा जाधव, दगू इंगळे, दिलीप खैरनार, दीपक जाधव, नामदेव पवार, संदीप घायाळ, राजाभाऊ चाफेकर, रविराज धाकराव, दीपक जाधव, राजू कराड, दादासाहेब कदम, संजय साळुंके, नाना सूर्यवंशी, परशराम सरोदे, दीपक कुलकर्णी, प्रदीप गुंजाळ, मनोज जाधव, विलास डांगे, रवि घोडे, दीपक सरोदे, अनिल मुथा, सुनील मुथा, राहुल गायकवाड, गणेश गोसावी, तुळशीराम जाधव, चेतन सोनवणे आदी उपस्थित होते.