शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पेशवाईची शान ठरलेला ‘सरकारवाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:14 AM

नाशिक हे धार्मिक, प्राचिन व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. या शहराला अश्मयुगापासून ते आधुनिक इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. तसेच पुरातत्त्वाचा अमूल्य ठेवाही मिळाला असून, पूर्वजांनी त्यांच्या कलेचा सोडलेला अमूल्य असा वारसाही शहरात पहावयास मिळतो. जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने शहराच्या वारसास्थळांची सफर घडविणारी मालिका .

‘वारसा’ नाशिकचानाशिक : पेशवेकाळाची साक्ष देत उभा असलेला ‘सरकारवाडा’ हा अद्भुत वारसा नाशिककरांना लाभला आहे. पुणेकरांना ज्याप्रमाणे शनिवारवाड्याचे अप्रूप आहे तसेच नाशिककरांना सरकारवाड्याचे आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित वास्तूंच्या यादीत स्थान मिळविलेल्या या वास्तूच्या नूतनीकरणाचा पुढील टप्पा निधीच्या प्रतीक्षेत आहे. राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास नूतनीकरणाच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे. प्रस्तावित सहा कोटींचा निधी यासाठी लागणार आहे.पेशवेकालीन सरकारवाडा ही नाशिकमधील पुरातन वास्तू. या वास्तूला राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तूचा दर्जा बहाल केला आणि त्याचे रूपडे पालटण्यास सुरुवात झाली, मात्र काही महिन्यांपासून या वास्तूच्या नूतनीकरणाला ग्रहण लागले आहे. सरकारवाड्याची वास्तू पेशवेकालीन स्थापत्यकला आणि वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी आहे. पेशव्यांचा सगळा प्रशासकीय कारभार याच वास्तूमधून चालविला जात होता. एकूणच पेशव्यांपासून इंग्रजांपर्यंतच्या राज्यकारभाराचे मुख्य केंद्र, दरबार, तुरुंग, पोलीस ठाणे अशा विविध कारणांसाठी सरकारवाड्याचा वापर वेगवेगळ्या काळात केला गेला. सध्या सहायक पुरातत्त्व संचालकांचे कार्यालय व प्रादेशिक पुरातन वस्तुसंग्रहालय सरकारवाड्यात आहे. पूर्वजांचा ‘वारसा’ जतन करण्यासाठी शासनाकडून अद्याप ५ कोटी ८७ लाख रुपये दुरुस्ती व सुशोभीकरणावर खर्च केले आहे. पुढील कामासाठी प्रस्तावित ६ कोटींचा निधी अद्याप उपलब्ध होऊ न शकल्याने काम थांबले आहे.नूतनीकरणापुढेसमस्यांचा अडथळासरकारवाड्याची वास्तू कात टाकत असताना तिच्या सौंदर्याला बाधा ठरणारे विद्युत रोहित्र, खांब अद्याप दर्शनी भागापासून इतरत्र संबंधित विभागाकडून स्थलांतरित करण्यात आलेले नाही. तसेच वाड्याभोवती असलेले विक्रेत्यांचे अतिक्रमणदेखील महापालिकेला हटविण्यात आले नाही. पेशवाईची शान असलेल्या या वाड्यासाठी निधीची कमतरता भासत असून, आगामी नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारकडून या वाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी निधी पुरविला जाईल, अशी आशा वारसास्थळप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.नाल्याचे पाणी सरकारवाड्यात४बोहरपट्टी परिसरातून वाहणाºया भूमिगत नाल्याचे सांडपाणी सरकारवाड्याच्या वास्तूत गटारीच्या माध्यमातून तळमजल्यात साचले आहे. आठवडाभरापासून तळमजल्यात साचणाºया पाण्याचा शोध पुरातत्त्व विभागाकडून घेण्यात आला. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला गेला तरीदेखील अद्याप सांडपाणी थांबविण्यास मनपाला यश आलेले नाही. या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

टॅग्स :historyइतिहासNashikनाशिक