सणासुदींच्या पार्श्वभूमीवर नाशकात साड्यांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:04+5:302021-09-03T04:16:04+5:30

कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम आणि अटींचे पालन करून यावर्षी लक्षिका मंगल कार्यालय, लवाटेनगर ,नाशिक येथे २ ते ५ सप्टेंबर ...

Sari display in Nashik on the backdrop of festivals | सणासुदींच्या पार्श्वभूमीवर नाशकात साड्यांचे प्रदर्शन

सणासुदींच्या पार्श्वभूमीवर नाशकात साड्यांचे प्रदर्शन

कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम आणि अटींचे पालन करून यावर्षी लक्षिका मंगल कार्यालय, लवाटेनगर ,नाशिक येथे २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड काळात दुकाने बंद असल्याने कारागिरांना मोठा तोटा सहन करावा लागला. याच काळात त्यांचे आर्थिकदृष्ट्या अतोनात हाल झाले. परंतु आता कोविडचे नियम शिथील झाल्याने कारागिरांना मदत व्हावी म्हणून व त्यांचा माल आता थेट ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्याने कारागिरांना मोठी मदत होणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह प्रभा, सायली चव्हाण, प्रतिभा भदाने, मयुरा मांढरे, भाग्यश्री महावरकर, शीला साळुंखे आदी महिला उपस्थित होत्या.

020921\02nsk_56_02092021_13.jpg

हस्तकलेतून तयार साड्याच्या प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, सीमा  हिरे  यांच्यासह प्रभा, सायली चव्हाण, प्रतिभा भदाने, मयुरा मांढरे, भाग्यश्री महावरकर, शिला साळुंखे आदी

Web Title: Sari display in Nashik on the backdrop of festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.