सराईत गुन्हेगारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:39 IST2019-01-19T00:39:08+5:302019-01-19T00:39:58+5:30
वडाळागावातील नारळ विक्रेत्याच्या घरात घुसून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा तसेच परिसरात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार शौकीत शहा (२०) यास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

सराईत गुन्हेगारास अटक
इंदिरानगर : वडाळागावातील नारळ विक्रेत्याच्या घरात घुसून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा तसेच परिसरात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार शौकीत शहा (२०) यास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
दीड महिन्यांपूर्वी महेबूबनगर येथे मागील भांडणाची कुरापत काढून नारळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यास घरात घुसून दोन सराईत गुन्हेगार आणि त्याच्या तीन साथीदारांनी लोखंडी रॉडने मारहाण केली होती. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सराईत गुन्हेगार शौकीत शहा हा फरार होता.
अखेर त्यास अटक करण्यात आली असून, त्याचा साथीदार सराईत गुन्हेगार आणि तीन साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.