परिसरातील ग्रामस्वच्छतेसाठी सरसावले पहुचीबारीकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 10:35 PM2020-09-08T22:35:32+5:302020-09-09T00:51:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : कोरोना आजाराने संपूर्ण भारत देशात थैमान घातले आहे. त्यातच सतत पडत असलेल्या पावसामुळे आजाराचे प्रमाण वाढत असल्याकारणाने व लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पेठ तालुक्यातील पहुचीबारी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले करंजखेड गावचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पहुचीबारी गावातील ग्रामस्थ व युवकांनी संपूर्ण गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवले.

Sarasavale Pahuchibarikar for village cleanliness in the area! | परिसरातील ग्रामस्वच्छतेसाठी सरसावले पहुचीबारीकर !

पहुचीबारी येथे ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी ग्रामस्थ व युवक.

Next
ठळक मुद्देरस्ते तसेच आपल्या घराशेजारील आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला.

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : कोरोना आजाराने संपूर्ण भारत देशात थैमान घातले आहे. त्यातच सतत पडत असलेल्या पावसामुळे आजाराचे प्रमाण वाढत असल्याकारणाने व लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पेठ तालुक्यातील पहुचीबारी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले करंजखेड गावचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पहुचीबारी गावातील ग्रामस्थ व युवकांनी संपूर्ण गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवले.
गावात काही ठिकाणी अस्वच्छता असल्याने डासांचे प्रमाण वाढून ताप, मलेरिया, हातपाय दुखी अशा अनेक प्रकारच्या रोगराईला माणूस बळी पडतो. सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे म्हणून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.
गावातील सर्व ग्रामस्थांनी अभियानात सहभाग घेऊन गावातील रस्ते तसेच आपल्या घराशेजारील आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. तसेच एक दिवस श्रमदान करून ग्रामस्वच्छता करण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक धमर्राज मोरे, नामदेव पाडवी, मिननाथ चौरे, निवृत्ती पाडवी, केशव चौरे, दूर्वास पाडवी, रोहिदास राऊत, रामभाऊ चौधरी, हनुमंत मोरे, सोमनाथ मोरे, पांडुरंग चौरे, यादव गवळी, लक्ष्मण मोरे, चंद्रकांत पाडवी, जगन मोहरे, ज्ञानेश्वर खोटरे तसेच महिलावर्ग, गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Web Title: Sarasavale Pahuchibarikar for village cleanliness in the area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.