सराईत घरफोड्या कुट्टीकडून सव्वापाच लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:13 IST2018-10-15T00:05:02+5:302018-10-15T00:13:22+5:30
पंचवटी पोलिसांनी कारागृहातून ताब्यात घेतलेला सराईत घरफोड्या हसन हमजा कुट्टी (३९, रा. अश्वमेधनगर, पेठरोड) याने तीन घरफोड्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून ५ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

सराईत घरफोड्या कुट्टीकडून सव्वापाच लाखांचा ऐवज जप्त
नाशिक : पंचवटी पोलिसांनी कारागृहातून ताब्यात घेतलेला सराईत घरफोड्या हसन हमजा कुट्टी (३९, रा. अश्वमेधनगर, पेठरोड) याने तीन घरफोड्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून ५ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
नाशिकरोड कारागृहात असलेला संशयित कुट्टी याचा पंचवटी पोलिसांनी ताबा घेऊन सखोल चौकशी केली़ त्याने पंचवटी, सातपूर व अंबड पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली़ त्याच्याकडून चारचाकी वाहनासह चोरीचे दोन टायर आणि तीन एलसीडी टीव्ही असा सुमारे ५ लाख २९ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक दीपक गिरमे, शेगर, हवालदार अरुण गायकवाड, बाळा ठाकरे, विलास बस्ते, सुरेश नरवडे यांनी ही कारवाई केली़