सराईत गुन्हेगार सोनवणे तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:05 IST2018-02-28T01:05:07+5:302018-02-28T01:05:07+5:30

पंचवटी : चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, शस्त्रास्त्रे बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार किरण छगन सोनवणे यास तडीपार केले आहे़

Saraiat criminals violate the goldwork | सराईत गुन्हेगार सोनवणे तडीपार

सराईत गुन्हेगार सोनवणे तडीपार

पंचवटी : म्हसरूळ, पंचवटी तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांत चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगल्या प्रकरणी पंधराहून अधिक गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार किरण छगन सोनवणे (२४) यास पोलीस आयुक्तांनी नाशिक शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे़ म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सोनवणे याने परिसरातील अनेक ठिकाणाहून सोनसाखळी चोरी केल्या़ याशिवाय बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, तसेच परिसरातील काही ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या प्रकरणात सोनवणे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली़

Web Title: Saraiat criminals violate the goldwork