विसापूर फाटा येथे सराफाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:47 IST2020-10-02T21:53:26+5:302020-10-03T00:47:08+5:30

येवला : तालुक्यातील विसापूर फाटा येथे सराफ व्यवसायीकाला अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून 1 लाख 30 हजाराची लूट केली आहे.

Sarafa was looted at Visapur Fata | विसापूर फाटा येथे सराफाला लुटले

विसापूर फाटा येथे सराफाला लुटले

ठळक मुद्देसुमारे 1 लाख 30 हजाराचा ऐवज लुटून नेला.

येवला : तालुक्यातील विसापूर फाटा येथे सराफ व्यवसायीकाला अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून 1 लाख 30 हजाराची लूट केली आहे.
तालुक्यातील विखरणी येथे साई कृपा ज्वेलर्स नावाने सराफ व्यवसाय करणारे संतोष दत्तात्रय बाविस्कर (45, रा. मनमाड ता. नांदगाव) हे नेहमीप्रमाणे गुरूवारी, (दि. 1) रोजी दुपारी 4. 45 वाजेच्या सुमारास विखरणी येथून विसापूर फाटा मार्गे मनमाडकडे निघाले होते. खडीक्र ेशर जवळील निर्जनस्थळी पाठीमागून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी बाविस्कर यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोने, चांदी व रोख रक्कम, दुकान साहित्य असे सुमारे 1 लाख 30 हजाराचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी तालुका पोलिसांत लुटीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत करीत आहे.

 

Web Title: Sarafa was looted at Visapur Fata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.