ओझर : जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मातोश्री फुलामाता यांचे रविवारी पहाटे लाखलगाव येथे निधन झाले. फुलामाता यांचे रविवारी पहाटे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अंत्यदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. प्रारंभी लाखलगाव येथील माधवराव बोरस्ते विद्यालया जवळील पटांगणात फुलामातांचे पाद्यपूजन , दर्शन सोहळा झाला. यावेळी शांतिगिरी महाराज यांनी मंत्र घोषात मातोश्रींचे पाद्यपूजन करून दर्शन घेतले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. शांतिगिरी महाराज यांनी प्रवचनातून जन्मदाता, आई आणि सद्गुरु माऊली यांना सर्वोच्च स्थान असून त्यांचे उपकार आपण कधीही फेडू शकणार नाही असे सांगितले. यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराच्यावतीने गोदावरीतीरी नित्यनियम विधी , नामजप करून श्रद्धांजली अर्पण केली.
शांतिगिरी महाराजांच्या मातोश्रींचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:39 IST