संजीवनगर भागात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:26 IST2019-05-04T01:25:35+5:302019-05-04T01:26:36+5:30
अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस चारचाकी गाडीत बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजीवनगर भागात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
सिडको : अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस चारचाकी गाडीत बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनगर येथे राहणाºया एका अल्पवयीन मुलीस त्यांच्याच इमारतीत राहणाºया दुर्गेश श्रीवास्तव याने चारचाकी गाडीत बोलावून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीच्या पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुर्गेश यास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु, संशयिताने त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित दुर्गेश राजेश श्रीवास्तव यांच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी दुर्गेशची बहीण ज्योती राजू श्रीवास्तव यांनीही अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार ज्योती यांचा भाऊ दुर्गेश व त्याची प्रेयसी ही इमारतीच्या तळमजल्यावर बोलत असताना रफिक बकरीदन मन्सुरी, सईमहमंद मन्सुरी व समी महमंद मन्सुरी यांनी लाकडी व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर दुर्गेश यास जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सविता गांगुर्डे पुढील तपास करीत आहेत.