संजीवनगरला युवकावर हल्ला; रुग्णालयात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 01:55 IST2022-07-06T01:55:06+5:302022-07-06T01:55:30+5:30
अंबड लिंक रोडवरील संजीव नगर भागात मंगळवारी (दि.५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एका युवकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. या हल्ल्यात सदरे आलम शब्बीर शेख (१९) रा. बिहार हा युवक गंभीररीत्या जखमी झाला. रात्री १२च्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

संजीवनगरला युवकावर हल्ला; रुग्णालयात मृत्यू
सिडको : अंबड लिंक रोडवरील संजीव नगर भागात मंगळवारी (दि.५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एका युवकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. या हल्ल्यात सदरे आलम शब्बीर शेख (१९) रा. बिहार हा युवक गंभीररीत्या जखमी झाला. रात्री १२च्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजीव नगर भागात जत्रा सुरू आहे. या जत्रेच्या पाठीमागील भागात असलेल्या मोकळ्या मैदानात आलम यास अज्ञात व्यक्तीने अडवून धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात किंचाळत आलम कोसळला. माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, नंदन बगाडे व गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी आलमला त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच रात्री १२ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, हल्ला कोणी व का केला? हे उशिरापर्यंत समजू शकलेले नव्हते. पोलीस याबाबत शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू होता. तसेच अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामही सुरू होते.