त्र्यंबकेश्वर तालुक्यात संजीवनी सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:21 IST2020-07-06T23:17:09+5:302020-07-07T01:21:20+5:30

त्र्यंबकेश्वर तालुक्यात विविध उपक्रमांनी कृषिदिन साजरा करण्यात आला. कृषिदिनापासून तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महिलांसाठी कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून, यास महिलावर्गाचा प्रतिसाद लाभत आहे.

Sanjeevani week in Trimbakeshwar taluka | त्र्यंबकेश्वर तालुक्यात संजीवनी सप्ताह

त्र्यंबकेश्वर येथे कृषी शाळेत महिलांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी.

ठळक मुद्देसामुंडी : महिलांसाठी भात पीक शेती शाळेचे आयोजन

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात विविध उपक्रमांनी कृषिदिन साजरा करण्यात आला. कृषिदिनापासून तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महिलांसाठी कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून, यास महिलावर्गाचा प्रतिसाद लाभत आहे.
कृषिमंत्री दादा भुसे, इगतपुरी - त्र्यंबकचे आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत या सप्ताहा-निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. कृषी अधिकारी संदीप वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कृषी सहायक, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आदी महिला व पुरुषांसाठी कृषी शाळांचे आयोजन करीत आहेत.
कृषी विभागामार्फत १ ते ७ जुलै या दरम्यान कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथे कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांसाठी भात पीक शेतीशाळेच्या दुसऱ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गात प्रशिक्षणार्थींना चटई रोपवाटिकेचे महत्त्व, यंत्राद्वारे भात लागवडीच्या खर्चाचा ताळेबंद, युरिया, डीएपी ब्रीकेटच्या वापराबाबत माहिती देण्यात आली. तसेच पुढील वर्गांमध्ये घेण्यात येणाºया विषयांची रूपरेषा विशद करण्यात आली. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर तसेच सॅनिटायझर व मास्क यांचा अवलंब करूनच सध्या वर्ग सुरू आहेत.

Web Title: Sanjeevani week in Trimbakeshwar taluka