Sanjay Raut | संजय राऊत नाशिकमध्ये, माजी नगरसेविका हर्षदा गायकर शिंदे गटात
By संजय पाठक | Updated: February 14, 2023 13:48 IST2023-02-14T13:44:59+5:302023-02-14T13:48:13+5:30
ठाकरे गटाने नेते दौऱ्यावर असताना, तेथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करणे हे आता नवीन राहिलेले नाही

Sanjay Raut | संजय राऊत नाशिकमध्ये, माजी नगरसेविका हर्षदा गायकर शिंदे गटात
संजय पाठक, नाशिक: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेतेमंडळी नाशिकमध्ये आल्यानंतर त्याच दिवशी त्यांच्या गटाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात जाण्याचे योग अनेकदा जुळून आले आहेत. आज शिवसेना नेते संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर येत असतानाच, त्यांच्या गटाच्या माजी नगरसेविका हर्षदा गायकर या शिंदे गटात दाखल होत आहेत. आज दुपारी चार वाजता मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे.
नाशिक महापालिकेच्या प्रभाग २६ मधून निवडून आलेल्या नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या प्रभागात दीड महिन्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमास शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्या वेळेसच या संदर्भात चर्चा चालू होती. मात्र खासदार निधीतून काम असल्यामुळे वरिष्ठांना विश्वासात घेऊन खासदार हेमंत गोडसे यांना आपण निमंत्रित केले, असा दावा हर्षदा गायकर यांनी केला होता. अखेर त्यानंतर आता गायकर या शिंदे गटात दाखल होत असून त्यांचे पती संदीप हे देखील प्रवेश करणार आहेत.