उमराणे सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय देवरे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 13:49 IST2020-12-15T13:47:33+5:302020-12-15T13:49:39+5:30

उमराणे : येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय खंडेराव देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Sanjay Deore unopposed as the President of Umrane Cooperative Society | उमराणे सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय देवरे बिनविरोध

उमराणे सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय देवरे बिनविरोध

आवर्तन पध्दतीनुसार पदाचा कार्यकाळ संपल्याने मावळते अध्यक्ष राजेंद्र पुंडलिक देवरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परिणामी रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी देवळा येथील शासकीय कार्यालयात देवळा तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अध्यासी अधिकारी डी. एन. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. यात संजय देवरे यांच्या बिनविरोध निवडीचा ठराव मांडण्यात आला. त्यास सर्व संचालकांनी संमती दिल्याने बिनविरोध निवड झाल्याचे देशमुख यांनी जाहीर केले. निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी सचिव व्ही.टी.देवरे, लिपिक सुधीर देवरे यांनी मदत केली. याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, सोसायटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र देवरे, उपाध्यक्ष सुपडू देवरे, लक्ष्मण नंदाळे, भरत देवरे, प्रशांत देवरे, लक्ष्मीबाई देवरे, सुवर्णा देवरे, राजेंद्र नारायण देवरे, दिलीप देवरे, सुभाष देवरे, मांगू पवार, संदीप देवरे, नंदकिशोर देवरे,अरुणा देवरे, मीना देवरे आदिंसह सोसायटीचे कर्मचारी अरुण मोरे, सुरेश देवरे यावेळी उपस्थित होते.

Web Title: Sanjay Deore unopposed as the President of Umrane Cooperative Society