मनमाड रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 16:22 IST2019-08-03T16:22:19+5:302019-08-03T16:22:34+5:30
स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती रॅली

मनमाड रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहीम
ठळक मुद्दे रेल्वे स्थानकावर फलाट , बुकींग कार्यालय आदी भागात साफ सफाई
मनमाड: मनमाड रेल्वे स्टेशन व परिसरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती रॅली काढण्यात आली. रेल्वे स्थानकावर फलाट , बुकींग कार्यालय आदी भागात साफ सफाई करण्यात आली.
यावेळी मनमाड रेल्वे स्थानकावरील साफसफाई करण्यात आली परिसर लखलखीत करण्यात आला. मोहिमेत स्टेशन प्रबंधक एस,के,गलांडे, मुख्य वाणिज्य निरीक्षक विवेक भालेराव, आरोग्य अधिकारी जितेंद्र कोठावदे, राधेशाम शहारे, तिकीट निरिक्षक संजय काबळे, निरीक्षक लकडा,नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सचिव प्रवीण निकम, आर,आर,भावसार यांच्या सह संत बारणबा शाळेचे विद्यार्थी व सफाई कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.