वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:17 IST2018-10-30T16:17:26+5:302018-10-30T16:17:38+5:30

सटाणा : तालुका प्रशासनाने पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरु वात केली आहे.त्याचच एक भाग म्हणून वाळू उपसा रोखण्यासाठी बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी विशेष मोहीम उघडली असून या मोहिमेंतर्गत मंगळवारी मध्यरात्री वाळूची चोरटी वाहतूक करण्याऱ्या एका डंपरसह दोन वाळूचे ट्रॅक्टर पकडून दंडात्मक कारवाई केली.

 The sand transporter dumper, the tractor caught | वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर पकडले

वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर पकडले

सटाणा : तालुका प्रशासनाने पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरु वात केली आहे.त्याचच एक भाग म्हणून वाळू उपसा रोखण्यासाठी बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी विशेष मोहीम उघडली असून या मोहिमेंतर्गत मंगळवारी मध्यरात्री वाळूची चोरटी वाहतूक करण्याऱ्या एका डंपरसह दोन वाळूचे ट्रॅक्टर पकडून दंडात्मक कारवाई केली. तहसीलदारांच्या या मोहिमेमुळे वाळू माफियांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे. बागलाण तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे आॅक्टोबरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होऊन दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.गेल्या मिहन्यापासून बागलाण पूर्व ,काटवन ,मध्य बागलाणमध्ये टँकरची मागणी वाढू लागली आहे.यंदा इतिहासात प्रथमच टंकरची संख्या उचांक गाठणार असल्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.त्यानुसार बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी उपाय योजना सुरु केल्या आहेत.पाणी टंचाईला वाळू उपसा हे देखील एक कारण असल्याने तहसीलदार हिले यांनी वाळू उपसा रोखण्यासाठी १२ जणांचे दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.त्यानुसार काल पिहल्या दिवशी विशेष भरारी पथकाने धांद्री येथील गिरणा नदीपात्रात मध्यरात्रीच्या सुमारास छापे टाकून अवैध वाळू उपसा करणार्या दोन ट्रक्टर व चालकांना रंगेहाथ पकडण्यात आले.मात्र वाळू उपसा करणारे आठ मजूर मात्र फरार झाले.तसेच पहाटेच्या सुमारास ताहाराबाद कडून एमएच ४१ एयु ०५७६ क्र मांकाचा ट्रक ताडपत्री बांधून वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती तहसीलदार हिले यांना मिळाली होती.त्यांनी ताहाराबाद रस्त्यावरील ढोलबारे येथे सापळा रचून ट्रक पकडण्यात आला.विनापरवाना वाळू वाहतूक केल्याने चालकासह ट्रक वर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Web Title:  The sand transporter dumper, the tractor caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक