मनपा कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्याला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:10 IST2021-01-01T04:10:40+5:302021-01-01T04:10:40+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. शहरातील गोविंदनगरमध्ये एप्रिल महिन्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला ...

मनपा कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्याला मंजुरी
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. शहरातील गोविंदनगरमध्ये एप्रिल महिन्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासूनच महापालिकेने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू असून, कोरोना विरोधातील लढाईत मनपाचे अनेक कर्मचारी, तसेच अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात काहींना जीवदेखील गमवावा लागला. वैद्यकीय उपचारात त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणाची मागणी स्थायी समिती आणि महासभेत वारंवार करण्यात आली होती; परंतु निर्णय घेण्यास तब्बल सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागला असला तरी, प्रशासनाला उशिरा का होईना जाग येऊन त्यांनी विम्याचा प्रस्ताव सादर केला. प्रथम वैद्यकीय विभागाने अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विमा काढण्याचा प्रस्ताव तयार केला; परंतु वैद्यकीय विभागाने त्यात पुन्हा बदल करत, १४८१ पर्यंत संख्या मर्यादित केली. वैद्यकीय विभागाने दिलेल्या सुधारित आकडेवारीनुसार १८ ते ४० वयोगटातील ९४५, ४१ ते ५० वयोगटातील ३२८ व ५१ ते ६० वयोगटातील २०८ अशा प्रकारे एकूण १,४८१ कर्मचाऱ्यांचा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला होता. त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्करचा समावेश न करण्यात आल्याने सदस्य कल्पना पांडे, स्वाती भामरे यांनी विरोध दर्शवून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना विमा संरक्षण देण्याची मागणी केली. त्यानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस असे ७०० तर १४३ आशा वर्करचाही या आरोग्य विमा योजनेत समावेश करण्याचे आदेश सभापती गणेश गीते यांनी प्रशासनाला दिलेत.