संस्कारभारतीतर्फे नृत्यांगनांचा झाला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:27 IST2018-03-26T00:27:34+5:302018-03-26T00:27:34+5:30

संस्कारभारती नाशिकरोड शाखेच्या स्थापना वर्षपूर्तीनिमित्त नृत्यांजली व नृत्यांगनांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि.२१) नाशिकरोडच्या ताराराणी सभागृहात सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी नृत्यांगना रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी, सुमुखी अथणी, कीर्ती भवाळकर, शिल्पा देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा केतकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उमाकांत निखारे उपस्थित होते.

Sanchari Bharati Bharat honored by dancers | संस्कारभारतीतर्फे नृत्यांगनांचा झाला सत्कार

संस्कारभारतीतर्फे नृत्यांगनांचा झाला सत्कार

नाशिक : संस्कारभारती नाशिकरोड शाखेच्या स्थापना वर्षपूर्तीनिमित्त नृत्यांजली व नृत्यांगनांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि.२१) नाशिकरोडच्या ताराराणी सभागृहात सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी नृत्यांगना रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी, सुमुखी अथणी, कीर्ती भवाळकर, शिल्पा देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा केतकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उमाकांत निखारे उपस्थित होते. यावेळी नृत्यांगना सोनाली करंदीकर यांच्या शिष्यांनी सुंदर नृत्याविष्कार सादर केला. वासंती नाईक, प्रिया करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. संस्कारभारतीच्या नाशिकरोड शाखेतर्फे प्रत्येक महिन्यात शहरातील मुक्तिधाम, इच्छामणी गणपती मंदिर आदी मंदिरांमध्ये ज्येष्ठ नृत्यांगनांच्या उपस्थितीत नृत्यसेवा समर्पित करण्यात आली. या उपक्रमाची वर्षपूर्तीही यावेळी साजरी करण्यात आली. या माध्यमातून शास्त्रीय कलेचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. कार्यक्रमास कलाप्रेमी विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sanchari Bharati Bharat honored by dancers

टॅग्स :Nashikनाशिक