समीर भुजबळांच्या मातोश्रींचं नाव मतदार यादीतून गायब, भुजबळ संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 13:09 IST2019-04-29T13:05:58+5:302019-04-29T13:09:19+5:30
नाशिक मतदारसंघात छगळ भुजबळ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

समीर भुजबळांच्या मातोश्रींचं नाव मतदार यादीतून गायब, भुजबळ संतप्त
नाशिक - नाशिक मतदारसंघात छगळ भुजबळ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत भुजबळ कुटुंबीयही उपस्थित होते. छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ या भुजबळ कुटुंबीयांनी सपत्नीक मतदान केलं आहे. मतदार केंद्रावर केल्यानंतर भुजबळांनी मतदान अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदार यादीतून गायब झालं आहे. हे सगळं ठरवून केलं जातंय, असाही गंभीर आरोपही भुजबळांनी केलाय. हिराबाई मगन भुजबळ हे समीर भुजबळ यांच्या आईचं नाव असून, मतदार यादीतून समीर भुजबळांच्या आईचं नाव गायब असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत.