येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट २०१७ ते जानेवारी २०१८ या सलग सहा महिन्यांत कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनदेखील कांद्याच्या भावात सततची तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र दिसले; परंतु गेल्या १५ दिवसात कांद्याचे भाव १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आल्याने बळीराजाची चिंता वाढली. कांद्याचा भाव २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असावा, अशी माफक अपेक्षा बळीराजाची आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजार स्थापने-पासूनच्या ६० वर्षांच्या इतिहासात आॅगस्ट ते जानेवारी २०१८ या सहा महिन्यात तब्बल एक कोटी सात लाख दोन हजार १६१ क्विंटल कांद्याची आवक झाली. या सलग सहा महिन्यात जानेवारीअखेरपर्यंत कांद्याला सरासरी २८०० ते ३००० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला.महाराष्ट्रालगतच्या पाच राज्यांत अतिपावसाने थैमान घातल्याने कांदा पीक पुरते संपल्याने, देशांतर्गत कांद्याची गरज भागवण्याची जबाबदारी निसर्गानेच महाराष्ट्रावर टाकली. देशातील मागणी आणि पुरवठा याचे समीकरण जुळल्याने सर्वसामान्य शेतकºयाच्या कांद्याला सलग सहा महिने चांगला भाव मिळाला. शेतकºयांच्या हातात पैसा आला. त्यामुळे अनेक शेतकºयांनी ट्रॅक्टरदेखील खरेदी केले. कांद्याला भाव सलगपणे टिकतात हे प्रथमच सिद्ध झाल्याने शेतकºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भाव घसरले की आंदोलन होणारच; परंतु किमान २००० रुपये प्रतिक्विंटल भाव टिकावेत एवढी किमान अपेक्षा बळीराजाची आहे.
निर्यातमूल्य शून्य झाल्यानंतरही हाल : किमान दोन हजार रुपये भावाची अपेक्षा कांदा उत्पादक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:18 IST
येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या इतिहासात सहा महिन्यांत कांद्याची आवक होऊनदेखील भावात तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र दिसले.
निर्यातमूल्य शून्य झाल्यानंतरही हाल : किमान दोन हजार रुपये भावाची अपेक्षा कांदा उत्पादक हवालदिल
ठळक मुद्दे२८०० ते ३००० रु पये प्रतिक्विंटल भावगरज भागवण्याची जबाबदारी