शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

समान बांधकाम नियमावलीतून पुन्हा ‘दत्तक नाशिक’वर घाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:55 IST

राज्यातील सर्व शहरांसाठी समान बांधकाम नियमावली करण्याच्या नावाखाली राज्य शासनाने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिकवर घाला घातला असून, चटई क्षेत्रात घट, पार्किंगमध्ये वाढ तसेच अ‍ॅमेनिटीज स्पेसमध्येदेखील वेगळे नियम लागू केल्याने बांधकाम व्यावसायिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देजाचक : वाहनतळ क्षेत्रात वाढ, चटई क्षेत्रात घट, तर अ‍ॅमेनिटीजसाठी घोळ

नाशिक : राज्यातील सर्व शहरांसाठी समान बांधकाम नियमावली करण्याच्या नावाखाली राज्य शासनाने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिकवर घाला घातला असून, चटई क्षेत्रात घट, पार्किंगमध्ये वाढ तसेच अ‍ॅमेनिटीज स्पेसमध्येदेखील वेगळे नियम लागू केल्याने बांधकाम व्यावसायिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाहनतळाच्या क्षेत्रात वाढ, चटई क्षेत्रात घट तर अ‍ॅमेनिजसाठी नागपूरपेक्षा नाशिक, पुण्याला वेगळे नियम असा प्रकार असून, या नियमांमुळे नाशिकच्या बाबतीत समानतेपेक्षा विषमताच अधिक स्पष्ट होणार असून, नाशिककरांवर नवे संकट असल्याचे मत बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केले. दरम्यान, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलने यासंदर्भात शनिवारी (दि.१६) पत्रकार परिषद घेऊन या नियमावलीस विरोध तर केला आहेच, शिवाय आक्षेप घेतल्यानंतरही दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.नाशिक शहरासाठी दोन वर्षांपूर्वी विकास आराखडा मंजूर करतानाच नवीन बांधकाम नियंत्रण नियमावली मंजूर करण्यात आली. ही नियमावलीच इतकी जाचक आहे की, ती बदलण्यासाठी विकासक मंत्रालयात आणि मुख्यमंत्र्यांकडे खेट्या घालून थकले असताना आता सर्व शहरांसाठी समान नियम करण्याच्या नावाखाली रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रस्ताव आणल्याची प्रतिक्रिया विकासकांतून उमटत आहे.राज्य शासनाने सर्व महापालिका क्षेत्र तसेच अन्य छोट्या शहरांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे ठरवले असून, त्यासाठी प्रारूप अधिसूचना ८ मार्च रोजी जारी करण्यात आली आहे. त्यावर हरकती आणि सूचनांसाठी तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सदरच्या अधिसूचनेत अन्य शहरांना तीन एफएसआय दिला असून, नाशिकसाठी मात्र दोन एफएसआय देण्याचा प्रस्ताव आहे. व्यावसायिक इमारत बांधताना १०० चौरस मीटर बांधकामासाठी ११२ चौरस मीटर पार्किंग सोडावी लागणार आहे. त्यामुळे बांधकाम करणे अशक्य होणार आहे. याशिवाय नागपूर महापालिकेला वेगळे नियम लागू करण्यात आले असून, नागपूर शहराकरिता दहा हजार मीटरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यास १० टक्के इतकी नियमानुकल आहे.अ‍ॅमेनिटीज स्पेसमध्ये भेदभावपूर्वी नाशिक शहरात ० ते १ हेक्टर क्षेत्रासाठी १२ टक्के इतके क्षेत्र सोडावे लागत होते. आता ४००० मीटरसाठी एकूण क्षेत्राच्या १५ टक्के इतके क्षेत्र सोडावे लागेल. पुण्यासाठीदेखील हाच नियम प्रस्तावित आहे. छोट्या प्रकल्पांची यातून सुटका झाली असली तरी नागपूरला मात्र १० हजार मीटरसाठी फक्त १० टक्के इतकेच क्षेत्र सोडावे लागणार आहे. म्हणजेच मालेगाव आणि धुळ्यासारख्या ड वर्ग महापालिकांच्या दर्जासमकक्ष सुविधा मुख्यमंत्र्यांच्या नागपूर महापालिकेला देण्यात आल्या आहेत, असा आरोप बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार