शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस स्मृतीदिन : बंदुकीच्या फैरीने शहिदांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 20:05 IST

यावेळी दिघावकर म्हणाले, अर्धसैनिकी बलाच्या विविध दलातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करतात त्या शहिदांचे सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत देशसेवा व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

ठळक मुद्देस्मृतीस्तंभावर अधिकाऱ्यांकडून पुष्पांजली

नाशिक : सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी (दि.२१) पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहीद पोलिसांच्या स्मृतींना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्या. त्यानंतर उपस्थित वरिष्ठ अधिकारी वर्गाने स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण केले.२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील भारताच्या सीमेवर केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा जवान गस्तीवर घालत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी हल्ला केल्याने गस्तीवरील पोलिसांना वीरमरण आले होते. या वीर जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी तसेच आपल्या कर्तव्य व राष्ट्रनिष्ठेची जाणीव सदैव मनात ठेवावी म्हणून शहीद पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो.

त्या औचित्यावर पोलिस प्रशासनाच्या वतीने मुख्यालयात बुधवारी सकाळी स्मृतीदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विभागीय पोलीस आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधिक्षक सचीन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कवायत मैदानावर हजर असलेल्या पोलिसांच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडल्या. तसेच पोलीस बॅन्ड पथकाने विशेष शहीद स्मृती धून वाजविली. यावेळी शहीद झालेल्या त्या शुरवीर शहीद पोलिसांच्या नामोल्लेख करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान सुरक्षित सामाजिक अंतर राखण्यात आले. तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी मास्कचाही वापर केल्याचे दिसून आले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMartyrशहीद