शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

देशात सर्वाधिक गृहनिर्माण क्षेत्रातील विक्रीचा वेग नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 1:20 AM

जाचक नियमावलीतील अडचणी, आॅटो डीसीआर आणि त्यानंतर आर्थिक मंदीचे सावट यातून बांधकाम व्यवसाय सावरू लागला आहेत. इतकेच नव्हे तर देशात टू टियर सिटीजमध्ये रियल इस्टेट क्षेत्रात विशेषत गृह विक्रीत सर्वाधिक २५ टक्के वाढ नाशिकमध्ये झाल्याचा एका संस्थेचा अहवाल आहे.

नाशिक : जाचक नियमावलीतील अडचणी, आॅटो डीसीआर आणि त्यानंतर आर्थिक मंदीचे सावट यातून बांधकाम व्यवसाय सावरू लागला आहेत. इतकेच नव्हे तर देशात टू टियर सिटीजमध्ये रियल इस्टेट क्षेत्रात विशेषत गृह विक्रीत सर्वाधिक २५ टक्के वाढ नाशिकमध्ये झाल्याचा एका संस्थेचा अहवाल आहे. त्यानंतर जयपूर शहराचा क्रमांक असल्याचे इंटरनॅशनल प्रॉपर्टी कन्सलटंटच्या त्रैमासिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याला आधार असून, गेल्या वर्षी जेथे महापालिकेने अवघे ४३५ गृहनिर्माण प्रस्तावांना मंजुरी दिली होती, या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत सुमारे दोन हजार प्रकरणांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राबरोबरच त्याच्याशी संबंधित व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आले आहेत.हवा, पाणी आणि उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा यामुळे नाशिकचा नेहमी राहणीयोग्य म्हणून नावलौकिक राहिला आहे. मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्ण त्रिकोण मानला गेला. त्यामुळे नाशिक हे देशभरासाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. विशेषत: मुंबई आणि पुण्याची विकासाची क्षमता संपत चालल्याने नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून नाशिककडे बघितले जाते. त्यामुळे नाशिकमध्ये गृहनिर्माण क्षेत्र विशेष चर्चेत ठरले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असले तरी यंदाच्या आर्थिक वर्षात लक्षणीय सुधारणा झाली आहे. अलीकडेच इंटरनॅशनल प्रॉपर्टी कन्सल्टंट अ‍ॅरोनॉक या संस्थेने वीस शहरांची पाहणी केली. त्यात गृहविक्रीत सर्वाधिक २५ टक्के वाढ नाशिकमध्ये नोंदवली गेली आहे. त्यानंतर जयपूरमध्ये २२ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या काही वर्षांत बांधकाम व्यावसायिकांना जाणवणाऱ्या अडचणी कमी होऊ लागल्या आहेत. आधी हरित लवादाचे निर्बंध, त्यानंतर विकास आराखडा रखडला. मात्र २०१७ मध्ये शहर विकास आराखडा आणि बांधकाम नियंत्रण नियमावलीदेखील मंजूर झाली. टीडीआर वापरावर मर्यादा आणि वाहनतळासाठी जादा जागा सोडण्याची सक्ती यादेखील अडचणी होत्या. त्यानंतर आॅटो डीसीआरने व्यावसायिकांची अडचण करून टाकली. मात्र, गेल्या वर्षभरात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात व्यावसायिकांची दखल घेत अडचणी सोडविल्या.आॅटोडीसीआरमधील सुधारणारा आणि विशिष्ट कालावधीनंतर आॅफलाइन प्रस्ताव स्वीकारणे यासह अन्य अनेक सुधारणांमुळे महापालिकेचा कारभार गतिमान झाला आहे. त्यातच गृहनिर्माण क्षेत्रासाठी अनुकूल, अशा अनेक घटना घडमोडी होत आहेत. दरम्यान, आता मंदीचे सावट दूर होत असून, मुख्यत्वे बांधकाम व्यावसायिकांना येणाºया अडचणी दूर होऊ लागल्याने आता पुन्हा गृहनिर्माण व्यवसायाला बुस्ट मिळाली आहे. त्याचा परिणाम दृष्य स्वरूपात दिसत आहे. गेल्यावर्षी म्हणजे १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च२०१९ पर्यंत महापालिकेने ४३५ बांधकाम प्रकरणांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर १ एप्रिल २०१९ ते १३ डिसेंबरपर्यंत १ हजार ९३५ प्रकरणे मंजूर झाली आहेत. म्हणजेच मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकरणे मंजूर होत असून, या क्षेत्रातील मंदी घटल्याचे दिसत आहे.महापालिकेला अडीचशे कोटीमहापालिकेला नगररचना विभागात विकास शुल्काच्या माध्यमातून निधी मिळतो. गेल्यावर्षी बांधकाम प्रस्ताव मंजुरीच्या माध्यमातून महापालिकेला १०२ कोटी रुपये मिळाले होते. मात्र यंदा १ एप्रिलपासून १३ डिसेंबरपर्यंत अडीचशे कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहेत. अजून तीन महिने कालावधी शिल्लक असून, या कालावधीत आणखी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या नगररचना विभागाकडे १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत बांधकाम परवानगीची एकूण ५९९ प्रकरणे दाखल झाली होती. त्यात ४३५ प्रकरणे मंजूर झाली. १०१ प्रकरणे नामंजूर करण्यात आली, तर ६३ प्रकरणे प्रलंबित होती. १ एप्रिल २०१९ ते १३ डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण २ हजार ७९८ प्रकरणे सादर करण्यात आली होती. त्यातील १ हजार ९३५ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. ४२४ प्रकरणे विविध कारणांनी नामंजूर करण्यात आली आहेत, तर १०१ प्रकरणे नामंजूर करण्यात आली असून, ३४८ प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष सरण्यास आणखी तीन महिने शिल्लक असून, या कालावधीत किमान तीनशे ते पाचशे प्रकरणे मंजूर होऊ शकतील.नाशिक शहरात मूलभूत सुविधा आहेत. हवा-पाणी उत्तम आहे. दळणवळणाची साधने वाढली आहेत. मेट्रोदेखील सुरू होत आहेत. महानगर म्हणून शहराला आवश्यक असणाºया सर्वसुविधा उपलब्ध आहेत. सध्या सुरू असलेल्या शेल्टरच्या प्रदर्शनात एकाच दिवसात शंभर घरे बुक झाली. त्यामुळे मंदीचे मळभ दूर झाल्याचे दिसत आहेत.- राधाकृष्ण गमे, आयुक्त, मनपागेल्या काही वर्षांत बांधकाम क्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. मात्र ती कमी झाली. त्यातच शहरातील घरे यापूर्वी विक्रीविना पडून होती. आता नव्या घरांची मागणी वाढू लागली आहे. मनपाने नवीन प्रकरणे दाखल झाली आणि ती मंजूरदेखील झाली आहेत. क्रेडाईसारख्या संस्थेने नाशिकचे देशपातळीवर केलेले ब्रॅँडिग उपयुक्त ठरले आहे.- उमेश वानखेडे, अध्यक्ष, क्रेडाई, मेट्रो

टॅग्स :NashikनाशिकHomeघरbusinessव्यवसायNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका