ग्रामीण भागात गुटख्याची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 18:55 IST2020-02-15T18:54:48+5:302020-02-15T18:55:45+5:30
सर्वत्र बंदी असताना ग्रामीण भागात खुलेआम गुटखा विक्री होत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, सरकारने कानाडोळा केल्याचे स्पष्ट होत आहे.

ग्रामीण भागात गुटख्याची विक्री
ओझर : सर्वत्र बंदी असताना ग्रामीण भागात खुलेआम गुटखा विक्री होत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, सरकारने कानाडोळा केल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यात आघाडी सरकारच्या काळात गुटखाबंदी करण्यात आली. सुरुवातीच्या काळात कठोरपणे राबविण्यात आली. परंतु त्यानंतर चिरीमिरी सुरू झाली आणि संबंधित यंत्रणेला त्याची सवय झाली. परंतु नवी उमेद घेऊन वयात येणारी तरु णाई याला स्टेटस सिम्बॉल म्हणू लागली व हीच बाब तेथेच गंभीर होऊ लागली. बंदी असताना छुप्या पद्धतीने सगळीकडे गुटखा विक्र ी सुरू आहे. ती संबंधित प्रशासनाला ठाऊक नाही असेदेखील नाही. पण तराजूत समान वजन पडल्यानंतर ते बरोबरीत सुटतं त्याच पद्धतीने पुड्या खाऊन रस्ते आणि भिंतीचे कोपरे लाल करण्याचे काम सुरू आहे.
स्वत:ला गुटखा किंग संबोधणाऱ्यांनी मात्र यंत्रणा आमचीच असल्याचा डिंगोरा सगळीकडे पिटला जात आहे. आघाडी सरकारने केलेली बंदी युती सरकारने कायम ठेवली. पण रस्त्यांवर दिसणाºया रिकाम्या पुड्या वाढत गेल्याची बाब समोर आली आहे. आता महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. ज्या अजित पवारांनी कडक शब्दात गुटखाबंदी केली त्यांनीच मागच्या आठवड्यात त्याला मोक्का कायद्याचे कवच दिले आहे. परंतु खालची यंत्रणा मात्र पूर्णपणे पक्की झाल्याने सदर कायद्यालादेखील केराची टोपली दाखवली जाते की काय, अशी शक्यता आहे.
गुटख्यामुळे तरु णाई कर्करोगाच्या विळख्यात आहे. त्यांचे पारिवारिक व आर्थिक संतुलन पूर्णपणे कोसळून गेले आहे. गुटखाबंदीला लागलेले ग्रहण हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सुटलेले नाही. आता उपमुखमंत्र्यांनी मोक्काची केलेली घोषणा किती तत्परतेने अमलात येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.