प्लॅन टू नॉनप्लॅन शिक्षकांचा पगार होणार नियमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:13 IST2021-09-25T04:13:39+5:302021-09-25T04:13:39+5:30
सिन्नर : टी. एस. पी.च्या रेग्युलर पगारासाठी राज्यात एकूण अडीच कोटी रुपये वार्षिक तरतूद केली असून, पुढील आठ दिवसात ...

प्लॅन टू नॉनप्लॅन शिक्षकांचा पगार होणार नियमित
सिन्नर : टी. एस. पी.च्या रेग्युलर पगारासाठी राज्यात एकूण अडीच कोटी रुपये वार्षिक तरतूद केली असून, पुढील आठ दिवसात वितरण होणार असल्याची माहिती कक्ष अधिकारी चव्हाण यांनी दिली. तसेच मेडिकल व फरक बिलांसाठी निधीची तरतूद महिनाअखेरपर्यंत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रालयात शिक्षण विभागात प्लॅन टू नॉनप्लॅन, जुनी पेन्शन योजना व मेडिकल फरक बिलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात शिक्षण सचिवांशी व कक्ष अधिकारी यांच्याशी पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आजगावकर, आमदार विक्रम काळे, मुख्याध्यापक संघाचे एस. बी. देशमुख, अविनाश हिरे, टी.एस. पी. ग्रुपचे सदस्य शिंदे, अहिरे, गायकवाड, आर. टी. जाधव, पाटील यांची सकारात्मक चर्चा झाली. यावेळी ते बोलत होते. प्लॅन टू नॉन प्लॅनच्या फाईलवर शालेय शिक्षण विभागाची टिप्पणी तयार असून, ही फाईल राज्यातील आदिवासी विकास विभागाचे मंत्री के. सी. पाडवी यांच्या शिफारशीसाठी पाठवण्यात आली आहे. पाडवी यांच्या शिफारशीनंतर ही फाईल वित्त विभागाकडे पाठवली जाईल, अशी माहिती मिळाली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
----------------------------
...तरच लढा यशस्वी होईल : डॉ. सुधीर तांबे
टी. एस. पी.च्या प्रश्नासाठी मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, नंदुरबारचे एन. डी. नांद्रे यांनी पाठपुरावा केला. यापुढेही ग्रुपमधील सदस्यांना एकत्रितपणे लढा द्यावा लागेल. वेळोवेळी मंत्रालयात पाठपुरावा करावा लागेल तरच प्रश्न मार्गी लागेल. जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी एकसंघ होऊन लढा उभारावा, शिक्षक व पदवीधर आमदार आपल्यासोबत असल्याचे तांबे म्हणाले.
फोटो ओळी: मुंबई येथे मंत्रालयात शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देताना आमदार सुधीर तांबे, एस. बी. देशमुख आदी. (२४ सिन्नर टिचर)
240921\24nsk_17_24092021_13.jpg
२४ सिन्नर टिचर