शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

साकुरी झाप गहिवरले : नाशिकचे सुपुत्र जवान सचिन मोरे अनंतात विलीन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 13:49 IST

जवानांना वाचविण्यास त्यांना यश आले असले तरी दुर्दैवाने सचिन यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना वीरमरण आले

ठळक मुद्देअंत्ययात्रेत ‘सॅनिटायझेशन’मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार शहीद जवान अमर रहें...,

नाशिक :भारतीय सैन्यदलाच्या इंजिनिअर ११५ रेजिमेंटमध्ये नाईक पदावर कर्तव्य बजावणारे मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप गावातील भूमिपुत्र सचिन विक्रम मोरे (३७) यांना तीन दिवसांपुर्वी भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्याच्या परिसरात सहकारी जवानांना नदीपात्रातून रेस्क्यू करताना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव शनिवारी (दि.२७) सकाळी लष्करी वाहनांच्या लवाजम्यासह रूग्णवाहिकेतून साकुरी झापमधील मोरेवाडी वस्तीवर आणण्यात आले. यावेळी वीरपत्नी सारिका व सचिनचे आई, वडील आणि सर्वच निकटवर्तीयांनी हंंबरडा फोडला.

सचिनच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील गावकरी मोठ्या संख्येने लोटले होते. यावेळी तरूणांची संख्या लक्षणीय होती. साश्रूनयनांनी साकुरी झापवासीयांनी आपल्या लाडक्या भूमिपुत्राला अखेरचा निरोप दिला. सचिनचे पार्थिव लष्कराच्या सजविलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आले होते. नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना केंद्राच्या जवानांनी हवेत बंदूकीच्या फैरी झाडत शहीद सचिनला अखेरची मानवंदना दिली.  यावेळी भारत माता की जय..., शहीद जवान अमर रहें..., बहिष्कार करों, बहिष्कार करो, चीन का बहिष्कार करो..., वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. उपस्थित प्रत्येक ाच्याच डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या.  यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार सुभाष भामरे, खासदार भारती पवार, आमदार सुहास कांदे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार जयवंत जाधव, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांतअधिकारी तहसीलदार उपस्थित होते.

भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात शहीद झालेले नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील भूमिपुत्र सचिन विक्रम मोरे यांचे पार्थिव पुण्यात रात्री विमानाने पोहचले. तेथे पार्थिवाला लष्करी सन्मान देण्यात आला. त्यांनतर सैन्य अधिकारी, जवान मोरे यांचे पार्थिव घेऊन नाशिक(मालेगाव)च्या दिशेने वाहनाने रवाना झाले. शनिवारी सकाळी मोरे यांच्या पार्थिवावर मालेगावातील साकुरी झाप या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मोरे हे 2003 साली भारतीय सैन्यात भरती झाले होते. ते इंजिनिअर रेजिमेंट मध्ये सध्या कर्तव्य बजावत होते. त्यांच्या पश्चत आई, वडील, वीरपत्नी सारिका, 2 मुली आणि एक सहा महिन्यांचा मुलगा आहे.जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप गावाचे भूमिपुत्र व भारतीय सेनेच्या इंजिनिअर रेजिमेंटचे जवान सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवरील गलवान खोऱ्यातील नदीत आपल्या सहकारी जवानांना वाचविताना वीरमरण आले. त्यांचे पार्थीव शनिवारी (दि.२७) सकाळी त्यांच्या मुळगावी लष्करी वाहनाने मध्यरात्री दाखल झाले. शनिवारी सकाळी लष्करी इतमामात मोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यामुळे मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
...अंत्ययात्रेत ‘सॅनिटायझेशन’वीर जवान सचिनला अखेरचा निरोप देण्यासाठी साकोरी झाप पंचक्रोशी अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. यावेळी प्रत्येकाने आपल्या तोंडावर रूमाल, मास्क लावलेला दिसून आला; मात्र तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी अंत्ययात्रेत ‘सॅनिटायझेशन’ ट्रॅक्टरच्या फवारणी यंत्राद्वारे करण्यात येत होते.

 

टॅग्स :MartyrशहीदchinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवानNashikनाशिकMalegaonमालेगांव