साकुरी झाप गहिवरले : नाशिकचे सुपुत्र जवान सचिन मोरे अनंतात विलीन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 01:28 PM2020-06-27T13:28:22+5:302020-06-27T13:49:54+5:30

जवानांना वाचविण्यास त्यांना यश आले असले तरी दुर्दैवाने सचिन यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना वीरमरण आले

Sakuri Zap imotional : Nashik's son Jawan Sachin More merged into infinity! | साकुरी झाप गहिवरले : नाशिकचे सुपुत्र जवान सचिन मोरे अनंतात विलीन !

साकुरी झाप गहिवरले : नाशिकचे सुपुत्र जवान सचिन मोरे अनंतात विलीन !

googlenewsNext
ठळक मुद्देअंत्ययात्रेत ‘सॅनिटायझेशन’मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार शहीद जवान अमर रहें...,

नाशिक :भारतीय सैन्यदलाच्या इंजिनिअर ११५ रेजिमेंटमध्ये नाईक पदावर कर्तव्य बजावणारे मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप गावातील भूमिपुत्र सचिन विक्रम मोरे (३७) यांना तीन दिवसांपुर्वी भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्याच्या परिसरात सहकारी जवानांना नदीपात्रातून रेस्क्यू करताना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव शनिवारी (दि.२७) सकाळी लष्करी वाहनांच्या लवाजम्यासह रूग्णवाहिकेतून साकुरी झापमधील मोरेवाडी वस्तीवर आणण्यात आले. यावेळी वीरपत्नी सारिका व सचिनचे आई, वडील आणि सर्वच निकटवर्तीयांनी हंंबरडा फोडला.

सचिनच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील गावकरी मोठ्या संख्येने लोटले होते. यावेळी तरूणांची संख्या लक्षणीय होती. साश्रूनयनांनी साकुरी झापवासीयांनी आपल्या लाडक्या भूमिपुत्राला अखेरचा निरोप दिला. सचिनचे पार्थिव लष्कराच्या सजविलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आले होते. नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना केंद्राच्या जवानांनी हवेत बंदूकीच्या फैरी झाडत शहीद सचिनला अखेरची मानवंदना दिली.  यावेळी भारत माता की जय..., शहीद जवान अमर रहें..., बहिष्कार करों, बहिष्कार करो, चीन का बहिष्कार करो..., वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. उपस्थित प्रत्येक ाच्याच डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या.  यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार सुभाष भामरे, खासदार भारती पवार, आमदार सुहास कांदे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार जयवंत जाधव, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांतअधिकारी तहसीलदार उपस्थित होते.


भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात शहीद झालेले नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील भूमिपुत्र सचिन विक्रम मोरे यांचे पार्थिव पुण्यात रात्री विमानाने पोहचले. तेथे पार्थिवाला लष्करी सन्मान देण्यात आला. त्यांनतर सैन्य अधिकारी, जवान मोरे यांचे पार्थिव घेऊन नाशिक(मालेगाव)च्या दिशेने वाहनाने रवाना झाले. शनिवारी सकाळी मोरे यांच्या पार्थिवावर मालेगावातील साकुरी झाप या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मोरे हे 2003 साली भारतीय सैन्यात भरती झाले होते. ते इंजिनिअर रेजिमेंट मध्ये सध्या कर्तव्य बजावत होते. त्यांच्या पश्चत आई, वडील, वीरपत्नी सारिका, 2 मुली आणि एक सहा महिन्यांचा मुलगा आहे.
जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप गावाचे भूमिपुत्र व भारतीय सेनेच्या इंजिनिअर रेजिमेंटचे जवान सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवरील गलवान खोऱ्यातील नदीत आपल्या सहकारी जवानांना वाचविताना वीरमरण आले. त्यांचे पार्थीव शनिवारी (दि.२७) सकाळी त्यांच्या मुळगावी लष्करी वाहनाने मध्यरात्री दाखल झाले. शनिवारी सकाळी लष्करी इतमामात मोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यामुळे मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
...अंत्ययात्रेत ‘सॅनिटायझेशन’
वीर जवान सचिनला अखेरचा निरोप देण्यासाठी साकोरी झाप पंचक्रोशी अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. यावेळी प्रत्येकाने आपल्या तोंडावर रूमाल, मास्क लावलेला दिसून आला; मात्र तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी अंत्ययात्रेत ‘सॅनिटायझेशन’ ट्रॅक्टरच्या फवारणी यंत्राद्वारे करण्यात येत होते.

 

Web Title: Sakuri Zap imotional : Nashik's son Jawan Sachin More merged into infinity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.