शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शंभरी गाठलेल्या सखुबाई, पार्वताबाई आजी १९६०पासून बजावताहेत मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 1:11 PM

आजींनी बोटाला लागलेली शाई दाखवित तरूणाईपुढे आदर्श ठेवला आहे.

ठळक मुद्दे १९६० सालापासून महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण १४ निवडणूकातरूणाईला मतदानासाठी आवाहन केले.

नाशिक :देवळाली विधानसभा मतदारसंघातील रहिवाशी असलेल्या सखुबाई चुंबळे आजी यांनी वयाची शंभरी गाठली असून त्या १९६० सालापासून विधानसभेच्या निवडणूकीत त्या सतत मतदानाचा हक्क अखंडितपणे बजावत आहेत. भगूर गावातील पार्वताबाई आजींनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी आपल्या नातवासोबत सखुबाई, पार्वताबाई आजींनी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन मतदान केले.

आजींचा उत्साह तितकाच दांडगा आणि तरूणाईला लाजविणार असाच होता. त्यांनीही ‘व्होट कर नाशिककर’ असे म्हणत तरूणाईला मतदानासाठी आवाहन केले. सखुबाई आजींचे वय जरी शंभर वर्षे असले तरीदेखील त्यांच्या आवाजात आजही बाणेदारपणा जाणवतो. आजींनी निवडणूक मतदार ओळखपत्र उंचावत आनंदाने मतदान केल्याचे दाखवून दिले. १९६० सालापासून महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण १४ निवडणूका अद्याप झाल्या. या सर्वनिवडणूकीत चुंबळे आजींनी आवर्जून मतदान केले आहेत. आजींनी बोटाला लागलेली शाई दाखवित तरूणाईपुढे आदर्श ठेवला आहे. भगूर गावातील पार्वताबाई आजींनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. पार्वताबाई आजी आपल्या नातवंडांच्या मदतीने मतदान केंद्रापर्यंत पोहचल्या. त्यांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर आजींनी आपल्या बोटावरील शाई मोठ्या अभिमानाने उंचावून दाखविली.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019devlali-acदेवळालीNashikनाशिकSenior Citizenज्येष्ठ नागरिक