शंभरी गाठलेल्या सखुबाई, पार्वताबाई आजी १९६०पासून बजावताहेत मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 01:11 PM2019-10-21T13:11:59+5:302019-10-21T13:13:10+5:30

आजींनी बोटाला लागलेली शाई दाखवित तरूणाईपुढे आदर्श ठेवला आहे.

Sakhubai, who reached Shambhari today, has been voting right since 1939. | शंभरी गाठलेल्या सखुबाई, पार्वताबाई आजी १९६०पासून बजावताहेत मतदानाचा हक्क

शंभरी गाठलेल्या सखुबाई, पार्वताबाई आजी १९६०पासून बजावताहेत मतदानाचा हक्क

Next
ठळक मुद्दे १९६० सालापासून महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण १४ निवडणूकातरूणाईला मतदानासाठी आवाहन केले.

नाशिक :देवळाली विधानसभा मतदारसंघातील रहिवाशी असलेल्या सखुबाई चुंबळे आजी यांनी वयाची शंभरी गाठली असून त्या १९६० सालापासून विधानसभेच्या निवडणूकीत त्या सतत मतदानाचा हक्क अखंडितपणे बजावत आहेत. भगूर गावातील पार्वताबाई आजींनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी आपल्या नातवासोबत सखुबाई, पार्वताबाई आजींनी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन मतदान केले.

आजींचा उत्साह तितकाच दांडगा आणि तरूणाईला लाजविणार असाच होता. त्यांनीही ‘व्होट कर नाशिककर’ असे म्हणत तरूणाईला मतदानासाठी आवाहन केले. सखुबाई आजींचे वय जरी शंभर वर्षे असले तरीदेखील त्यांच्या आवाजात आजही बाणेदारपणा जाणवतो. आजींनी निवडणूक मतदार ओळखपत्र उंचावत आनंदाने मतदान केल्याचे दाखवून दिले. १९६० सालापासून महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण १४ निवडणूका अद्याप झाल्या. या सर्व
निवडणूकीत चुंबळे आजींनी आवर्जून मतदान केले आहेत. आजींनी बोटाला लागलेली शाई दाखवित तरूणाईपुढे आदर्श ठेवला आहे. भगूर गावातील पार्वताबाई आजींनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. पार्वताबाई आजी आपल्या नातवंडांच्या मदतीने मतदान केंद्रापर्यंत पोहचल्या. त्यांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर आजींनी आपल्या बोटावरील शाई मोठ्या अभिमानाने उंचावून दाखविली.

 

Web Title: Sakhubai, who reached Shambhari today, has been voting right since 1939.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.