शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला ऑक्सिजन प्रकल्पासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 10:03 PM

त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी तालुक्याच्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ऑक्सिजन प्रकल्प ...

ठळक मुद्देप्रांताधिकाऱ्यांची सूचना : विश्वस्तांच्या निर्णयाकडे लक्ष

त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी तालुक्याच्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ऑक्सिजन प्रकल्प उभारावा, अशी सूचना प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानला केली आहे.तहसीलदार कार्यालयात बुधवारी (दि.५) कोरोना आढावा बैठकीत संभाव्य तिसरी लाट आल्यास त्यावर नियोजन करतांना ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची बैठक झाली होती. त्यात ४० सिलिंडर्स आरोग्य विभागाला देण्याचा ठराव मंजूर झाला होता. पण यासाठी किटसह ५० ते ६० लक्ष रुपये खर्च अपेक्षित असून तेवढाच खर्च शिवप्रसाद या देवस्थानच्या जागेत ऑक्सिजन प्रकल्प उभारला तर त्यात ऑक्सिजन निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्यामुळे देवस्थानच्या काही विश्वस्तांनी त्यास होकार दिला असल्याचे समजते. देवस्थानने परवानगी दिल्यास येत्या २५ ते ३० दिवसांत प्रकल्प उभा राहू शकतो. याशिवाय उपजिल्हा रुग्णालयात गरजू रुग्णांच्या उपलब्धतेनुसार रेमडेसिविरचा साठा शासनाकडून मिळू शकेल. जेणेकरून रुग्णांना नाशिकला नेण्याची गरज पडणार नाही. यावेळी चर्चेत प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, देवस्थानचे सचिव तथा मुख्याधिकारी संजय जाधव, विश्वस्त संतोष कदम, भूषण अडसरे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर