शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

सांस्कृतिक संचलनालयाला हिंदी नाट्य स्पर्धेबाबत साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 18:32 IST

नाशिक : यंदाच्या वर्षी ५९वी हिंदी राज्य नाट्य हौशी नाट्य स्पर्धेतील पुणे, नागपूर, ठाणे या केंद्रावर ५६ नाटके पार पडली. मात्र, मुंबई केंद्रावरील २५ नाटके सादर होणे बाकी असताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा बंद पडली.अतिमहत्त्वाच्या परीक्षादेखील झाल्या नसताना ही उर्वरित नाटके होण्यास प्रदीर्घ विलंब लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या नाटकांतून नाट्यस्पर्धेचा निकाल लावावा, अशी मागणी मुंबईवगळता अन्य केंद्रांवर नाटक सादर झालेल्या ५६ संस्थांच्या वतीने सांस्कृतिक संचलनालयाकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा बंदनाट्यस्पर्धेचा निकाल लावावा

नाशिक : यंदाच्या वर्षी ५९वी हिंदी राज्य नाट्य हौशी नाट्य स्पर्धेतील पुणे, नागपूर, ठाणे या केंद्रावर ५६ नाटके पार पडली. मात्र, मुंबई केंद्रावरील २५ नाटके सादर होणे बाकी असताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा बंद पडली.अतिमहत्त्वाच्या परीक्षादेखील झाल्या नसताना ही उर्वरित नाटके होण्यास प्रदीर्घ विलंब लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या नाटकांतून नाट्यस्पर्धेचा निकाल लावावा, अशी मागणी मुंबईवगळता अन्य केंद्रांवर नाटक सादर झालेल्या ५६ संस्थांच्या वतीने सांस्कृतिक संचलनालयाकडे करण्यात आली आहे.या राज्य स्पर्धेत आतापर्यंत ५६ नाटके सादर झालेली आहेत. जवळपास ७० टक्के स्पर्धा पूर्ण झाली असताना स्पर्धा बंद पडली. सद्यस्थितीत राज्यातील वाढती रु ग्णसंख्या व विशेषत: मुंबईतील कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता मुंबई पूर्ववत होईपर्यंत बराच कालावधी जाणार आहे. शिवाय नाट्यगृह व गर्दी होणारे कार्यक्र म यावर बंदी असल्यामुळे स्पर्धेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक परीक्षा कोरोनामुळे रद्द झाल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. त्यामुळे याच धर्तीवर ५९वी हिंदी हौशी नाट्य स्पर्धेत जेवढी नाटके सादर झाली त्यावर आधारित निकाल जाहीर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मराठी हौशी प्राथमिक स्पर्धा, हिंदी अंतिम स्पर्धा आणि मराठी अंतिम सह बालनाट्य, संस्कृत संगीत या सर्वच स्पर्धांचा सादरीकरणाचा खर्च, प्रवास खर्च, भत्ते अद्याप देण्यात आलेले नाही. त्या रकमा सुद्धा संबंधित सर्व संस्थांच्या खात्यात जमा कराव्या, अशी विनंती सर्व संबंधित ५६ संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNatakनाटक