दमदार पावसासाठी भोलेनाथाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 00:42 IST2021-07-13T23:43:58+5:302021-07-14T00:42:22+5:30
जुनी शेमळी : श्री क्षेत्र पहाडेश्वर येथे दमदार पावसासाठी भोलेनाथाला साकडे घालण्यात आले. सात जूनपासून शेतकरी राजा पावसाची वाट पाहत आहे. आता जवळजवळ जुलै महिन्याचे पंधरा दिवस उलटत आले तरी देखील पावसाने अजून दमदार हजेरी लावलेली नाही. बळीराजा संकटात सापडला आहे.

श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथे दमदार पावसासाठी अजमीर सौंदणा येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत असलेला रुद्राभिषेक .
जुनी शेमळी : श्री क्षेत्र पहाडेश्वर येथे दमदार पावसासाठी भोलेनाथाला साकडे घालण्यात आले. सात जूनपासून शेतकरी राजा पावसाची वाट पाहत आहे. आता जवळजवळ जुलै महिन्याचे पंधरा दिवस उलटत आले तरी देखील पावसाने अजून दमदार हजेरी लावलेली नाही. बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे चांगली पर्जन्यवृष्टी व्हावी व नदी-नाले वाहून शेतशिवार चांगले पिकावे, यासाठी अजमीर सौंदाणे येथील तीर्थक्षेत्र पहाडेश्वर येथे गावाच्यावतीने व सरपंच धनंजय पवार यांनी रूद्राभिषेक केला. यात नऊ जोडप्यांचा सहभाग होता.
यावेळी पंडित लौकिक जोशी यांनी पूजेचे मार्गदर्शन केले. पूजेसाठी रवींद्र पाटोळे, शरद नंदाळे, केदा मोरे, किरण आहिरे, पवार सर, कैलास सोनवणे, समाधान पगार, सदाशिव पवार, सावकार पल्हाळ, राजेंद्र पवार, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.