सैनिकाच्या पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:29 IST2019-03-11T01:28:39+5:302019-03-11T01:29:49+5:30

नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रातील वसाहतीत वास्तव्यास असलेले जवान श्रावण एन. (३०) यांच्या राहत्या घरात त्यांच्या पत्नी रौशनी एस. (२५) यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Sainik's wife suicide | सैनिकाच्या पत्नीची आत्महत्या

सैनिकाच्या पत्नीची आत्महत्या

नाशिक : नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रातील वसाहतीत वास्तव्यास असलेले जवान श्रावण एन. (३०) यांच्या राहत्या घरात त्यांच्या पत्नी रौशनी एस. (२५) यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तोफखाना केंद्रातील निवासस्थानी हे दाम्पत्य राहत होते. श्रावण हे तोफखाना केंद्रात सेवा बजावत असून, त्यांच्या राहत्या घरी शनिवारी (दि.९) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बेडरूममधील छताला असलेल्या पंख्याला रौशनी यांनी ओढणी बांधून गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सैनिकी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक जी. एम. काकड करीत आहेत.

Web Title: Sainik's wife suicide