शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅक की वाहनतळ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:15 IST

साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले असून तातडीने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शहर वाहतुकीचे सहायक पोलीस उपायुक्त डॉ. देवरे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.

इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले असून तातडीने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शहर वाहतुकीचे सहायक पोलीस उपायुक्त डॉ. देवरे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. साईनाथनगर चौफुली ते डीजीपीनगर क्र मांक एकपर्यंत जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. आरोग्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम असल्याने साईनाथनगर ते डीजीपीनगर यासह परिसरातील युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर नेहमीच वर्दळ असते. परंतु साईनाथनगर चौफुलीलगतच आॅनलाइन परीक्षा केंद्र असल्याने त्याठिकाणी जिल्ह्यातून विविध शहरांतून व गावातून परीक्षेसाठी विद्यार्थी वर्ग येतात. त्यातील बहुतेक विद्यार्थी सर्रासपणे जॉगिंग ट्रॅकमध्येच चारचाकी आणि दुचाकी लावतात त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना निर्माण झाला आहे. तसेच फेरफटका मारण्यास येणाऱ्या आबालवृद्धांनाही या अनधिकृत वाहनतळाचा त्रास होत आहे. तसेच काही वाहनधारक रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावत असल्याने वाहतुकीस अडथळा होऊन नेहमीच लहान-मोठे अपघात घडत असतात. मोठी दुर्घटना होण्याची वाट न पाहता तातडीने शहर वाहतूक पोलीस विभागाने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष रमीज पठाण यांनी दिली आहे.रस्त्यावर वाहने उभी केल्याने अडथळावडाळा-पाथर्डी रस्त्यावर कृष्णाईनगरसमोर महाविद्यालयातील विद्यार्थी रस्त्यावरच दुचाकी वाहने लावत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, सदिच्छानगर, पांडवनगरी, कृष्णाईनगर, सराफनगर, शरयूनगर, समर्थनगर आधी उपनगरे आहेत. या रस्त्यांवरच प्राथमिक-माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळे दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. अशातच कृष्णाईनगर समोर विद्यार्थी रस्त्यावरच दुचाकी लावत आहेत. सुमारे दीडशे ते दोनशे दुचाकी रस्त्यावरच उभ्या राहात असल्याने वाहनचालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यात वाहने उभी करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी शहर वाहतूक पोलिसांकडे नागरिकांनी केली आहे.कारवाईकडे दुर्लक्षरस्त्यावर असलेल्या एका महाविद्यालयाने त्यांच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वाहने उभी करण्यास मज्जाव केला असल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर आपली वाहने उभी करतात. त्यामुळे महाविद्यालयाने रस्त्यावरील वाहने आवारात उभी करावी, असे पत्र इंदिरानगर पोलीस ठाण्याने देऊनही त्यावर काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस