त्र्यंबकच्या उपनगराध्यक्षपदी सागर उजे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:59 IST2020-12-18T18:50:11+5:302020-12-19T00:59:59+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील उपनगराध्यक्षपदी सागर जगन्नाथ उजे यांची शुक्रवारी (दि.१८) झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपनगराध्यक्ष माधवी भुजंग यांनी रोटेशन पद्धतीनुसार पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर सागर उजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्र्यंबकच्या उपनगराध्यक्षपदी सागर उजे बिनविरोध
नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. यावेळी सागर उजे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांना सूचक म्हणून गटनेते समीर पाटणकर, तर अनुमोदक म्हणून स्वप्निल शेलार होते. लोहगावकर यांनी सागर उजे यांची बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी नगरसेवकांनी निवडीचे बाके वाजवून स्वागत केले. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत एकूण १९ नगरसेवक आहेत. त्यापैकी दोन शिवसेना, एक अपक्ष व १६ भारतीय जनता पक्षाचे असल्याने एक हाती सत्ता आहे. यावेळी कैलास चोथे, विष्णू दोबाडे, दीपक (लोणारी) गिते, शीतल उगले, त्रिवेणी तुंगार, सोनवणे, मंगला आराधी, कल्पना लहांगे, अनीता बागुल, सायली शिखरे, शिल्पा रामायणे, भारती बदादे, संगीता भांगरे, अशोक घागरे, श्यामराव गंगापुत्र आदी उपस्थित होते. यावेळी गटनेता समीर पाटणकर, स्वप्निल (पप्पू) शेलार, सुरेश गंगापुत्र, शांताराम बागुल, शिवराम झोले, संपतराव सकाळे, बाबासाहेब सानप आदींनी मनोगत व्यक्त केले.