शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

सुरक्षित वाहतूक : आकर्षक वेशभूषा, ढोलवादन, नृत्य, गायन, बक्षिसांची मेजवानी बाइक रॅलीद्वारे स्त्रीशक्तीचे दिमाखदार प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:07 IST

नाशिक : ढोलवादनाने दणाणून टाकलेला आसमंत, घोषणा व संदेश देत फ्लॅग दाखवताच आपापल्या बाइकसह निघून तितक्याच शिस्तीत राईड पूर्ण करून कार्यक्रमस्थळी हजर होत केलेला जल्लोष या साºयांनी सखी भारावून गेल्या होत्या.

ठळक मुद्देनिमित्त होते ‘राईड विथ प्राईक’ बाइक रॅलीचेठक्कर डोम येथून बाइक रॅलीला प्रारंभ

नाशिक : आल्हाददायक गारव्याची रम्य सकाळ, वैविध्यपूर्ण आकर्षक पोषाख, ढोलवादनाने दणाणून टाकलेला आसमंत, घोषणा वसंदेश देत फ्लॅग दाखवताच आपापल्या बाइकसह निघून तितक्याच शिस्तीत राईड पूर्ण करून कार्यक्रमस्थळी हजर होत केलेला जल्लोष या साºयांनी सखी भारावून गेल्या होत्या. निमित्त होते ‘राईड विथ प्राईक’ बाइक रॅलीचे. लोकमत सखी मंच आणि वॉव ग्रुप (विमेन आॅफ विजडम) यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.८) त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सखींना प्रारंभी सुरक्षित ड्रायव्हिंगबाबत शपथ देण्यात आली. सक्तीने हेल्मेट घालत, हॉर्नचा वापर न करता आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळत वाहन चालवत स्वत:बरोबरच समाजालाही सुरक्षितता प्रदान करावी, असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले. ठक्कर डोम येथून बाइक रॅलीला प्रारंभ झाला. जेहान सर्कल, कॉलेजरोड, त्र्यंबकरोड ते पुन्हा ठक्कर डोम या मार्गे रॅली पार पडली. याप्रसंगी नगररचनाच्या प्रतिभा भदाणे, आंतरराष्टÑीय धावपटू कविता राऊत, जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित, जिल्हा परिषद सदस्य सिमांतिनी कोकाटे, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, सरिता नरके, मेघा टिबरेवाल, अनिता टिबरेवाल, मीनू धाम, किरण चांडक, कामिनी तनपुरे, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नलिनी बागुल, पोलीस निरीक्षक नम्रता देसाई, अश्विनी न्याहारकर, रेखा देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.दुसºया सत्रात रॅली अंतर्गत रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ईस्ट अ‍ॅन्ड वेस्ट म्युझिकल ग्रुपच्या सदस्यांनी बॅँडवर गाणी सादर करीत सखींचे मन जिंकले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील, डॉ. अपर्णा पवार, ज्योती वाकचौरे, नलिनी कड, कांता राठी, मिसेस इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी, गौरी पांडे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.‘लकी ड्रॉ’तील विजेत्यांनाही बक्षिसे देण्यात आली. स्पर्धा परीक्षक म्हणून लविना थेवर, विद्या मुळाणे, उज्ज्वला बोधले, साधना पाटील यांनी काम पाहिले. परी ठोसर यांनी सूत्रसंचालन केले. वॉव बेस्ट थिम ग्रुप अंतर्गत एफपीए इसेन्स आॅफ इंडिया ग्रुपने प्रथम, शिवनेरी ग्रुपने द्वितीय तर दिल का दोस्त ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवला. वॉव बेस्ट ट्रॅडिशनल आउटफिट विथ सेफ्टी गिअर अंतर्गत गौरी भामरे (हेल्मेट आणि फेटा) प्रथम क्रमांक, लवाटेनगर ग्रुप (कचरा व्यवस्थापन) द्वितीय क्रमांक, अपर्णा ग्रुप (सॅनिटरी नॅपकिन) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. बेस्ट बायकर सिंगल गटात राजश्री निमकर विजेत्या ठरल्या. बेस्ट बायकरच्या मानकरी डेनिम गॅँग (बायकर व्हॅली ग्रुप) प्रथम क्रमांक , सारिका, श्रृती भुतडा ग्रुप द्वितीय क्रमांक, वॉव बायकर ग्रुप या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. सर्वाधिक संख्येने सहभागी ग्रुप प्रकारात लोकमत सखी मंच ग्रुप प्रथम क्रमांक, हेल्मेट ग्रुप (रस्ते सुरक्षा संदेश) द्वितीय क्रमांक, पाडवा ग्रुप (तिरंगा थिम) तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. बेस्ट बाइक अंतर्गत प्रथम क्रमांक संगीता लोढा (बेटी बचाव संदेश), गोवा बाइक द्वितीय क्रमांक, घोषवाक्य सजावट बाइक (एमएच १५, इ डब्ल्यू ६८१८) या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.