साध्वी प्रज्ञासिंहला अखेर जामीन
By Admin | Updated: April 26, 2017 01:14 IST2017-04-26T01:10:08+5:302017-04-26T01:14:32+5:30
साध्वी प्रज्ञासिंहलाअखेर जामीन
साध्वी प्रज्ञासिंहला अखेर जामीन
मालेगाव बॉम्बस्फोट; कर्नल पुरोहितचा जामीन फेटाळलामुंबई : सन २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रज्ञासिंह चंद्रपालसिंह ठाकूर ऊर्फ साध्वी हिला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. मात्र याच खटल्यातील आणखी एक आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित याला जामीन देण्यास नकार दिला. परिणामी गेली सुमारे नऊ वर्षे तुरुंगात असलेली साध्वी आता बाहेर येईल; पण पुरोहितला मात्र कारागृहातच राहावे लागेल.
मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने साध्वीचा जामीन अर्ज गेल्या वर्षी २८ जून रोजी तर पुरोहितचा जामीनअर्ज २९ सप्टेंबर रोजी फेटाळला होता. याविरुद्ध या दोघांनी केलेल्या अपिलांवर फेब्रुवारीत राखून ठेवलेले निकाल न्या. रणजीत मोरे व न्या.डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने मंगळवारी जाहीर केले.
आधी एटीएस व नंतर एनआयएने सादर केलेल्या तपासी अहवालांचा एकत्रितपणे विचार केला (पान ७ वर)चॉकलेट वाटली
साध्वीविरुद्ध सबळ पुरावे नसताना नाहक तिला नऊ वर्षे कारागृहात काढावी लागली. अखेर नऊ वर्षांनी न्याय मिळाला. आम्ही तो साजरा करू, अशी प्रतिक्रिया साध्वीचे मेव्हणे भगवान झा यांनी दिली. त्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या आवाराबाहेर पत्रकारांसह येणाऱ्या-जाणाऱ्यांना चॉकलेट वाटली.