शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
3
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
4
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
5
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो समोर आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
6
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
7
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
8
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
9
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
10
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
11
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
12
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
13
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
14
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
15
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
16
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
17
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
18
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
19
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
20
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

शिधापत्रिकेतील नावांसाठी साधूंचा दबाव

By admin | Updated: August 11, 2015 23:58 IST

मुख्यमंत्र्यांच्या नावे धमकी : प्रशासन वैतागले

नाशिक : ‘हमने कह दिया बस.... बीस से पच्चीस हजार साधू आएंगे, अब इन सबका आकडा लिखवा लो, अगर नही लिखवाते हो तो फिर देवेंद्रसे बात करेंगे, लगाए फोन गिरीश को?’ अशा शब्दात, तर कधी कधी उमा भारती, राजनाथसिंह या केंद्रीय मंत्र्यांच्या नावानेही टाकल्या जाणाऱ्या दबावाला प्रशासनातील अधिकारी वैतागले आहेत. सध्या साधुग्राममधील आखाडे, खालशांना तात्पुरत्या शिधापत्रिका वाटप केल्या जात असून, त्यासाठी सेक्टरनिहाय पुरवठा निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या निरीक्षकांनी थेट आखाडे व खालशांमध्ये जाऊन त्यांच्याकडून शिधापत्रिकेसाठीचा अर्ज भरून घेण्याच्या सूचना आहेत व पुराव्या- दाखल प्लॉट वाटपाचे पत्र त्यासाठी आवश्यक करण्यात आले आहे. प्रतिव्यक्तीस एका महिन्यासाठी पाच किलो धान्य रास्त दरात दिले जाणार असून, त्यासाठी खालसे, आखाड्यांमध्ये प्रत्यक्ष वास्तव्यास असणाऱ्या साधूंनाच त्याचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रत्यक्षात मात्र पुरवठा निरीक्षकांवर दबाव टाकून दहा ते पंचवीस हजार साधू-भाविक येणार असल्याचे सांगून अशा सर्वांसाठी रास्त दरात अन्नधान्य मिळावे, असा खालशांचा आग्रह आहे. जो मान्य करणे प्रशासनाला शक्य नाही; परंतु याबाबत त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या थेट पालकमंत्री, मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्र्यांच्या नावे धमकी दिली जात आहे. एकेका आखाडा व खालशांनी दिलेली संख्या व त्याप्रमाणात धान्यवाटप करण्यासाठी ठरविण्यात आलेले प्रमाण पाहता सध्या शासनाने उपलब्ध करून दिलेले धान्यदेखील अपुरे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)