बाजार समिती उपसभापतिपदी सद्गीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:51 IST2020-07-02T22:02:54+5:302020-07-02T22:51:32+5:30
नांदगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी टाकळी खुर्द येथील एकनाथ सदगीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नांदगाव बाजार समिती उपसभापतिपदी एकनाथ सदगीर यांची निवड झाल्यानंतर उपस्थित बापूसाहेब कवडे, तेज कवडे व सदस्य.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाजार समितीच्या उपसभापती मनीषा काटकर यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात गुरुवारी उपसभापति-पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक पी. जी. देवरे यांनी जाहीर केले. नामनिर्देशन पत्रावर संचालक भास्कर कासार यांनी सुचक म्हणून सही केली. उपसभापती निवडीपूर्वी संचालक मंडळाची शिवसेना कार्यालयात बैठक होऊन आमदार सुहास कांदे व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या उपस्थितीत एकनाथ सदगीर यांचे नावावर एकमत झाले.
यावेळी बाजार समितीचे सभापती तेज कवडे, संचालक विलास आहेर, भरत शेलार, गोरख सरोदे, पुंजाराम जाधव, राजेंद्र देशमुख, दत्तात्रय निकम, दिलीप पगार, भाऊसाहेब हिरे, श्रावण काळे, नंदू खरात, प्रफ्फुल पारख, भाऊसाहेब सदगीर, यज्ञेश कलंत्री, सरला दिवटे, अलका कवडे, यशोदाबाई हेंबाडे आदी उपस्थित होते.