एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:11 IST2019-02-11T18:11:05+5:302019-02-11T18:11:34+5:30
सिन्नर येथील माध्यमिक लोक शिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी विभागात सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

सिन्नर येथील एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी विभागात सूर्यनमस्कार स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी.
सिन्नर : येथील माध्यमिक लोक शिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी विभागात सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
इंग्लिश मीडियम स्कूल या संकुलात शनिवार (दि.९) रोजी शाळेच्या पटांगणात सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सूर्यनमस्कार स्पर्धेतून व्यायामाचे महत्व कृतीतून विद्यार्थ्यांना समजावे यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये इंग्लीश मिडीयमच्या चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आजच्या धावपळीच्या व अत्याधुनिक युगात मनुष्याचे शारीरिक, मानिसक व व्यायामाकडे असम्य दुर्लक्ष होते. त्यामुळे समाजाच्या व्यायामाकडे बघण्याचा कल बदलण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दररोज व्यायामाचा संकल्प केला. सूर्यनमस्कारामुळे सर्वांच्या दैनंदिन जीवनात अनेक शारीरिक बदल होतात. तसेच आपले तन मन दिवसभर चैतन्यमय राहते रोज सूर्यनमस्कार करणे हे शरीरासाठी आरोग्यदायी असे सूत्र असून दररोज सूर्यनमस्कार करणे आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी केले. स्पर्धेमध्ये छोट्या गटातून हर्षदा गडाख, मोठया गटातून सौरभ मोजाड या चिमुकल्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्राचार्य अनिता थोरात व
क्रीडा शिक्षक बळीराम आरखडे यांच्या संकल्पनेतून सदरचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष दौलतराव मोगल, व्यवस्थापक अभिषेक गडाख, शाळेच्या मुख्याध्यापक अनिता कांडेकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विकास गीते या मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शुभांगी मोगल, दीपक तांबे, देवराम वारे, सीमा सांगळे, अर्चना खरात, वैशाली राऊत, जयश्री शिंदे, अश्विनी बोराडे, कविता मोरे, प्राजक्ता कोकाटे यांनी परिश्रम घेतले.
फोटो क्र.- 10२्रल्लस्रँ02
फोटो ओळी-