शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

ग्रामीण शहरी असमतोलाने चीन, पाकिस्तानची गरजच नाही : पोपटराव पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:43 IST

जागतिकीकरणाच्या ओघात शहर व खेड्यांमधील विकासाचा समतोल साधण्यात देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटूनही यश आले नसल्याने ग्रामीण भाग व शहरी भागात मोठी दरी निर्माण झाली आहे.

नाशिक : जागतिकीकरणाच्या ओघात शहर व खेड्यांमधील विकासाचा समतोल साधण्यात देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटूनही यश आले नसल्याने ग्रामीण भाग व शहरी भागात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या मनात शहरी नागरिकांविरोधी व शहरी नागरिकांमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांविरोधात असंतोष निर्माण होत असून, ही असमतोलाची स्थिती लवकरात लवकर सावरली नाही, तर देशाला चीन व पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांची गरज उरणार नाही असे परखड मत आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे.  रावसाहेब थोरातसभागृहात नाशिक रोटरी क्लबतर्फे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय क ार्यासाठी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा चेअरमन विलास शिंदे यांचा शुक्रवारी (दि. २२) नाशिक भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजीमंत्री विनायकदादा पाटील, दिलीपसिंह बेनीवाल आदी उपस्थित होते. पोपटराव पवार म्हणाले, देशाच्या ७० वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर काळात पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, सामाजिक सद््भावना यांसारखे विविध प्रश्न आजही कायम आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील उत्पन्नाचे स्रोत संपले असून, शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भाग विभागले गेले असून, शेती व शेतकºयांच्या प्रश्नांवर तोडगा काढून ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्था समतोलात वाढली नाही, तर देशाला चीन व पाकिस्तानसारख्या शत्रूंची गरजच उरणार नाही, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला, तर वनाधिपती विनायकदादा पाटील, विलास शिंदे यांना मिळालेला पुरस्कार हा शेती क्षेत्राचाच सन्मान असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीनंदन भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती मराठे यांनी केले, तर मनीष चिंधडे यांनी आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी